Tuesday, September 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Article On Marriage : उपवर तरुणाई

by
March 11, 2026
in लाईफस्टाईल
A A
Article On Marriage : उपवर तरुणाई
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

– अजय उभे

Article On Marriage : एकेकाळी ‘लग्नाचे कार्य’ म्हणजे (Article On Marriage) गावाकडच्या आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा असायचा. पण आज ग्रामीण भागातील चित्र बदलले आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, विशेषतः शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांमध्ये ‘मुलांची लग्न‘ (Article On Marriage) हा केवळ कौटुंबिक विषय न राहता एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. शेतकरी पुत्रांच्या कपाळावर उमटलेली चिंतेची ही रेघ आज गावागावांत ‘लग्नाची वरात’ निघण्यापूर्वीच अडखळत असल्याचे विदारक चित्र आहे.

१. अपेक्षांची ‘मल्टीप्लेक्स’ गणिते

आज ग्रामीण भागातील मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षांचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. “मुलगा नोकरीला असावा, त्याला पुण्यात-मुंबईत फ्लॅट असावा आणि शेती नावापुरती असावी,” ही आता प्राथमिक अट झाली आहे. शिक्षणाच्या प्रसारामुळे मुलींचे सक्षमीकरण झाले, ही आनंदाची बाब आहे; मात्र या प्रक्रियेत ‘शेती’ करणाऱ्या मुलाला जीवनसाथी म्हणून नाकारण्याची प्रवृत्ती वाढली आहे. ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ पण ती आता शेतात राबणाऱ्या तरुणाच्या घरात पाय ठेवायला तयार नाही. यामुळे ग्रामीण भागातील हजारो तरुण आज वयाची तिशी ओलांडल्यानंतरही ‘उपवर’ म्हणूनच वावरत आहेत.

२. ‘अदृश्य हुंडा’

पूर्वी मुलांकडचे लोक हुंडा मागायचे, हा सामाजिक कलंक आजही पुसलेला नाही. पण आता परिस्थितीचे एक वेगळे टोक समोर येत आहे. अनेक ठिकाणी मुलाचे लग्न व्हावे म्हणून मुलाकडच्यांनाच मुलीच्या पालकांचे ‘लाड’ करावे लागत आहेत. लग्न लावून देण्यासाठी मध्यस्थांना मोठी रक्कम देणे, मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणे किंवा लग्नाचा सर्व खर्च मुलाकडच्यांनीच करणे, अशा स्वरूपाचा एक ‘उलटा हुंडा’ किंवा आर्थिक भार मुलांच्या कुटुंबावर पडत आहे. ही परिस्थिती मध्यमवर्गीय आणि गरीब शेतकरी कुटुंबांचे कंबरडे मोडणारी ठरत आहे.

३. लग्नाच्या नावाखाली ‘टोळी’कडून होणारी फसवणूक

हताश झालेली तरुण मुले आणि त्यांचे पालक यांचा फायदा घेण्यासाठी आजकाल काही ‘टोळ्या’ सक्रिय झाल्या आहेत. बाहेरच्या राज्यातील किंवा परजिल्ह्यातील मुलींचे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून पाच ते सात लाखांपर्यंतची रक्कम उकळली जाते. लग्न होते, पण अवघ्या काही दिवसांतच ती मुलगी दागिने आणि पैसे घेऊन पसार होते. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. सामाजिक प्रतिष्ठेपोटी अनेक कुटुंबे या फसवणुकीची तक्रारही पोलीस स्टेशनला करत नाहीत, हे अधिक भयंकर आहे.

४. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम

जेव्हा गावात तरुणांची लग्ने होत नाहीत, तेव्हा त्याचे परिणाम केवळ वैयक्तिक नसून सामाजिक असतात. तरुणांमध्ये येणारे नैराश्य, व्यसनाधीनतेकडे वळणारा कल आणि स्वतःच्या अस्तित्वाबद्दलची असुरक्षितता यामुळे ग्रामीण भागातील सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. “शेती आहे म्हणून लग्न होत नाही,” या भावनेतून तरुण शेतीपासून दुरावत आहेत आणि शहरात तुटपुंज्या पगारावर रखवालदाराची किंवा मजुरीची कामे पत्करत आहेत.

५. बदलाची गरज

या समस्येवर केवळ चर्चा करून चालणार नाही, तर समाजाच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडवून आणणे आवश्यक आहे:

पालकांची भूमिका
मुलींच्या पालकांनी केवळ ‘शहरी सुख’ न पाहता मुलाचे चारित्र्य आणि कष्टाळू वृत्तीला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

शेतीचा सन्मान
शेती हा व्यवसाय सन्मानाचा आहे, ही जाणीव समाजात रुजवावी लागेल. ‘शेतकरी नवरा नको’ ही मानसिकता बदलल्याशिवाय हा पेच सुटणार नाही.

सामूहिक विवाह सोहळे
लग्नातील अवाजवी खर्च टाळण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी गावपातळीवर विश्वासार्ह सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

आज ग्रामीण भागात “मुलगी द्यायला कुणी तयार नाही” ही ओरड म्हणजे उद्याच्या मोठ्या सामाजिक संघर्षाची नांदी आहे. जर हा प्रश्न वेळीच सुटला नाही, तर गावागावांत केवळ वृद्धांची संख्या वाढेल आणि कर्तबगार तरुण नैराश्याच्या गर्तेत हरवून जातील. लग्न ही एक कौटुंबिक संस्था आहे, तिला बाजारू स्वरूप येऊ नये आणि शेतकरी पुत्राला लग्नासाठी ‘पात्र’ ठरवण्यासाठी केवळ पगारपत्रकाची गरज भासू नये, हीच आजच्या काळाची गरज आहे.

हे पण वाचा : Marriage Problem: तरुणांना लग्नासाठी द्यावा लागतोय हुंडा; एकाच मुलीचे चार-चार विवाह लावून फसवणूक, आमदार सोळंकेंनी विधानसभेत मांडली व्यथा

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar