Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

परफेक्ट बॉडीशेप हवा तर हे आसन नियमित करा; जाणवतील हे बदल

by प्रभात वृत्तसेवा
April 25, 2021
in फिटनेस
A A
परफेक्ट बॉडीशेप हवा तर हे आसन नियमित करा; जाणवतील हे बदल
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

हे एक विपरीत शयनस्थितीतील आसन आहे. धनुरासनात दोन हात आणि दोन पाय यांचा उपयोग करून शरीराला धनुष्याकृती आकार दिला असला, तरी या आसनात एकच हात आणि एकच पाय यांचा उपयोग करून शरीराचा भाग धनुष्याकृती केला जातो. म्हणून याला अर्धधनुरासन म्हणतात.

प्रथम विपरीत शयनस्थितीत जावे. डावा पाय गुडघ्यात वाकवावा. डाव्या हाताने डावा पाय घोट्याजवळ पकडावा. त्याचवेळी उजवा हात डोक्‍याच्या दिशेने सरळ रेषेत ताणावा. श्‍वास सोडावा श्‍वास घेत घेत डाव्या हाताने डावा पाय ताणत डावी मांडी व गुडघा जास्तीत जास्त वर उचलावे. त्याचवेळी उजवा हात डोके, छाती वरून उचलून सरळ वरच्या दिशेने ताणावा. आसनस्थिती घेतल्यावर श्‍वसन संथ ठेवावे.

हे आसन अनुक्रमे एकदा डाव्या पायाने व एकदा उजव्या पायाने करता येते. ज्यावेळी आपण डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडतो, तेव्हा उजवा हात हवेत उचलतो, आणि ज्यावेळी उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडतो तेव्हा डावा हात हवेत उचलतो. एकेका बाजूने आपण शरीराची अर्धी बाजू धनुष्याकृती करत असतो. त्यामुळे जास्त ताण येतो व आसनस्थिती जास्त वेळ टिकवता येत नाही. सुरुवातीला पाच सेकंद स्थिरता राखू शकतो.

पण सरावाने आसनस्थिती पंधरा सेकंदापर्यंत किंवा त्याहून जास्तही टिकवता येते. आसन सोडताना श्‍वास सोडत अनुक्रमे उजवा हात, हनुवटी, छाती, डावी मांडी, गुडघा जमिनीवर टेकवावे. डावा पाय सरळ करावा. मग दोन्ही हात मांडीजवळ पूर्वस्थितीत आणून विपरीत स्थितीत घ्यावी. याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने म्हणजे उजवा हात व उजव्या पायाच्या सहाय्याने हे आसन करता येते. वाकलेला गुडघा उचलताना मघाशी सांगितल्याप्रमाणे पोटरी, मांडीवर ताण येतो पण मांडीवर न दाबता मांडीपासून दूर नेण्याचा प्रयत्न करावा. दुसरा पाय पूर्वस्थितीत जमिनीवर ठेवावा.

प्रथम योगतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावे. ज्यांचे हृदय अशक्‍त आहे. तसेच ज्यांना उच्च रक्‍तदाब आहे. ज्यांची अल्सर हर्नियासारखी ऑपरेशन्स झाली असतील त्यांनी हे आसन करू नये.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvayurvedablood pressurecaronacholesterolcorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietfitnesshealthhelth tipsinvestigatedlife stylelife style aarogya jagartopnewsधनुष्याकृतीफिटनेस
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar