Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Anjeer: उन्हाळ्यात अंजीर खावं की टाळावं? तज्ज्ञ सांगतात योग्य पद्धत आणि फायदे

by
April 3, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Anjeer: अंजीर हा एक पौष्टिक सुका मेवा मानला जातो. यात भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आरोग्यासाठी अंजीर खूप फायदेशीर मानलं जातं. मात्र, अंजीराची तासीर उष्ण असल्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, उन्हाळ्यात अंजीर खाणं योग्य आहे का?

उन्हाळ्यात शरीर लवकर डिहायड्रेट होतं आणि पचनसंस्थाही संवेदनशील बनते. त्यामुळे या काळात लोक उष्ण तासीर असलेल्या पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. अंजीराचाही त्यात समावेश होतो. पण तज्ज्ञांच्या मते, योग्य पद्धतीने खाल्ल्यास अंजीर उन्हाळ्यातही फायदेशीर ठरू शकतं.

तज्ज्ञ सांगतात की, अंजीर थेट खाण्याऐवजी ते रात्री पाण्यात भिजत ठेवून सकाळी खाणं अधिक चांगलं असतं. भिजवल्यामुळे अंजीराची उष्णता कमी होते आणि ते शरीरासाठी सौम्य बनतं. त्यामुळे उन्हाळ्यातही त्याचे फायदे मिळू शकतात आणि शरीराला त्रास होत नाही.

अंजीर मध्ये भरपूर फायबर असल्यामुळे ते वजन नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतं. ते खाल्ल्यावर पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. परिणामी, अनावश्यक खाणं कमी होतं आणि वजन कमी ठेवण्यास मदत होते.

तसेच, अंजीर शरीराला त्वरित ऊर्जा देण्यासाठीही उपयुक्त आहे. उन्हाळ्यात थकवा आणि सुस्ती जाणवणे सामान्य आहे. अशा वेळी सकाळी भिजवलेलं अंजीर खाल्ल्यास शरीराला नैसर्गिक साखर, व्हिटॅमिन बी आणि मिनरल्स मिळतात, ज्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटतं.

त्वचेसाठीही अंजीर खूप फायदेशीर आहे. यात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि ई असतात, जे त्वचेला पोषण देतात. त्यामुळे त्वचा चमकदार राहते, कोरडेपणा कमी होतो आणि उन्हामुळे होणाऱ्या नुकसानापासूनही संरक्षण मिळतं.

याशिवाय, अंजीर हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगलं मानलं जातं. यात पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

एकूणच, अंजीराची तासीर गरम असली तरी योग्य पद्धतीने सेवन केल्यास ते उन्हाळ्यातही खाता येतं आणि त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. मात्र, कोणत्याही आरोग्य समस्यांमध्ये आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar