[[{“value”:”
Measles Spread in US : अमेरिकेतील टेक्सास राज्यात गोवरचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, टेक्सासमध्ये गोवरमुळे मुलाचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये हा संसर्ग वेगाने पसरत असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे, त्यापैकी बहुतेक जण असे आहेत ज्यांनी गोवरची लस घेतलेली नाही. पण अश्यातच दुसऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
‘गोवर’ हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे, जो प्रामुख्याने मुलांना प्रभावित करतो. याचा परिणाम कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. ज्यांनी गोवरची लस घेतलेली नाही त्यांना याचा प्रामुख्याने परिणाम होतो. गोवरची मुख्य लक्षणे आणि प्रतिबंध जाणून घेऊया
गोवर कसा पसरतो?
गोवर हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे जो संक्रमित व्यक्ती खोकल्यावर किंवा शिंकल्यावर हवेत पसरणाऱ्या विषाणूद्वारे दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित करू शकतो. याशिवाय, हा आजार संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने किंवा एकाच खोलीत राहिल्याने देखील पसरू शकतो. हा विषाणू हवेत अनेक तास जिवंत राहू शकतो.
गोवरची लक्षणे काय आहेत?
– ३ ते ४ दिवसांपर्यंत जास्त ताप.
– वाहणारे नाक आणि खोकला
– डोळ्यांत लालसरपणा आणि पाणी येणे
– तोंडाच्या आत लहान पांढरे मुरुम
– शरीरावर लाल पुरळ येणे इ.
गोवर कसा रोखायचा?
गोवर रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. ही गोवरची लस साधारणपणे ९ महिन्यांच्या वयात आणि नंतर १५-१८ महिन्यांच्या वयात दिली जाते. ज्या मुलांना लसीकरण झालेले नाही त्यांना गोवर होण्याचा धोका जास्त असतो.
उपचार कसे केले जातात?
गोवरवर उपचार करण्यासाठी कोणतेही विशिष्ट अँटीव्हायरल औषध नाही, परंतु डॉक्टर त्याच्या लक्षणांवर आधारित काही औषधे लिहून देतात.
डिहायड्रेशन टाळण्यासाठी, डॉक्टर ओआरएस सोल्यूशन घेण्याची आणि भरपूर पाणी पिण्याची शिफारस करतात. याशिवाय, व्हिटॅमिन ए सप्लिमेंट्स दिले जातात, ज्यामुळे गोवरचा धोका कमी होऊ शकतो.
गोवर म्हणजे नक्की काय आहे?
गोवर हा विषाणूमुळे होतो. पॅरामाइक्सोव्हायरसशी तो संबंधित आहे आणि जेव्हा संक्रमित व्यक्तीला खोकला किंवा शिंक येते, तेव्हा हवेद्वारे गोवर पसरतो. हा विषाणू सहसा श्वसनमार्गामध्ये प्रवेश करतो आणि हळूहळू संपूर्ण शरीरावर परिणाम करतो.
इतरांच्या तुलनेत लस न घेतलेल्या लहान मुलांना जास्त धोका असतो. पण लस न घेतलेल्या गर्भवती महिला आणि लस घेऊनही रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नाही, अशा व्यक्तींना गोवरचा संसर्ग होऊ शकतो.
लसीबद्दल थोडक्यात माहिती :
भारताच्या राष्ट्रीय आरोग्य पोर्टल ( एनएचपी ) मध्ये म्हटले आहे, ‘ जागतिक आयोग्य संघटनेने सर्व मुलांसाठी लसीचे २ डोस सांगितले आहेत. एकच डोस किंवा गोवर रुबेला किंवा गोवर मम्प्स असे देता येतात. भारतात गोवर लस ही जागतिक प्रतिबंधक कार्यक्रमाअंतर्गत दिली जाते. गोवर रुबेला ही ९ ते १२ महिन्यात दिली जाते आणि दुसरा डोस हा १६ ते २४ महिन्यात दिला जातो.
The post America : अमेरिकेत ‘या’ धोकादायक आजाराने घातले थैमान; आणखी एका बाळाचा मृत्यू appeared first on Dainik Prabhat.
“}]]