Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘अशी’ घ्या बदलत्या वातावरणात त्वचेची काळजी

by प्रभात वृत्तसेवा
March 3, 2021
in लाईफस्टाईल
A A
‘अशी’ घ्या बदलत्या वातावरणात त्वचेची काळजी
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सतत बदलणाऱ्या हवेचा परिणाम त्वचा आणि केसांवर होतो. त्यांना हानी पोहोचते. त्यासाठी काय काळजी घ्यावी याची थोडक्‍यात माहिती. आयुर्वेदाने नेहमीच माणसाकडे निसर्गाचा एक अविभाज्य घटक म्हणून पाहिलंय. हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम माणसावर होतो आणि माणूस निसर्गात फेरफार करतो.

आपल्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतल्याने निरोगी राहण्यास मदत होते. हवामान तसेच पर्यावरणात झालेल्या बदलांची माहिती झाल्याने रोग्याची काळजी घेणे, पर्यायाने रोगांचे निर्मूलन करणे शक्‍य होते. पृथ्वीवर होणारे बदल लक्षात घेऊन आयुर्वेदाने वसंत, हेमंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, शिशिर हे सहा ऋतू मानले आहेत. मात्र हे सर्व ऋतू प्रत्येक देशांमध्ये जाणवतातच असे नाही. हेमंत, ग्रीष्म हे उत्तर ध्रुवावर तर वर्षा, शिशिर, शरद हे ऋतू दक्षिण ध्रुवावर आढळतात.

शारीरिक आरोग्याची आयुर्वेदिक संकल्पना तीन ऊर्जा संकल्पनांभोवती रचण्यात आली आहे. हे शरीरातील मानसिक किंवा रासायनिक स्त्रोत आहेत. या ऊर्जा घटकांवर संपूर्ण शरीराची क्षमता अवलंबून असते. वात, पित्त आणि कफ हे तीन रस जीवनाकरता आवश्‍यक असून, यांच्या परस्परकार्यातूनच निरोगी जीवन साकारते.

या तीन घटकांमध्ये परस्परांत असंतुलन निर्माण झाल्यास त्याची परिणती विविध प्रकारच्या आजारांची निर्मिती होण्यात होते. दोषाचे असंतुलन त्वचा आणि केस यामध्येही दिसून येते. त्यामुळेच त्वचाविषयक उपचारपद्धतींचे संतुलन करण्याची गरज वाढत्या प्रमाणावर भासत असून, ऋतूनुसार दोषाचे प्रकार बदलतात.

वर्षा ऋतूतील मुख्य भाग म्हणजे थंड, दमट हवा असून, यामुळे असंतुलन निर्माण होते आणि वात तसेच पित्ताला चालना मिळते. दमट त्वचा आणि केसांना हानी पोहोचवते, सूज येणे, त्वचा निस्तेज होणे आदी आजार डोके वर काढतात.

वात विकाराने दूषित त्वचा व केस

वातामुळे त्वचा तसेच केस आपले पोषकत्व टिकवून ठेवू शकत नाहीत. त्याकरता पोषकत्व वाढवण्याला प्राधान्य दिले पाहिजे. रासायनिक प्रिझर्वेटिव्हज वापरलेली स्कीन केअर उत्पादने टाळावीत. कारण यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचते आणि ती कोरडी पडते. तुमच्या त्वचेला तसेच केसांना पुरेसे पोषण मिळावे, यासाठी गरम, पोषक अन्न घ्यावं. कोरडे अन्न टाळा. रात्री लवकर झोपा आणि दररोज तेलाने मालिश करा.

गरम तसेच स्निग्ध पदार्थाचे सेवन करा (तूप व ऑलिव्ह ऑइल सर्वात चांगले)
संपूर्ण दिवसभर कोमट पाणी प्या आणि भरपूर प्रमाणात गोड, रसपूर्ण फळे खा. साधारणत: आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्‍यक असतं.

अल्कोहोलवर आधारित स्कीन क्‍लेनसर्स वापरू नका साबणाऐवजी चणाडाळीची पावडर वापरा
दाणे, बदाम, अक्रोड आणि त्याचे तेल, तीळ, सूर्यफुलाच्या बिया आणि त्याचे तेल, द्राक्षबियांचे तेल,

प्रिमरोज ऑइल, सोयाबीन ऑइल, सर्व प्रकारची धान्ये यांचे सेवन करावं.

कॅफीन, शीतपेय, साखर, चॉकलेट, पोटॅटो चीप्स आणि जंक फूड टाळावं.

पिंडाथायलम किंवा धनवंतरम कुझम्फू किंवा बालअश्वगंधी कुझम्फू यासारखे आयुर्वेदिक तेल दररोज आंघोळीपूर्वी 15 मिनिटे लावावं लवकर आणि नेहमी कोमट पाण्याने अंघोळ करावी.

पित्तामुळे होणाऱ्या त्वचा/ केस विकार

पित्ताने बाधित असलेल्या संवेदनशील त्वचेला शांत करण्यावर भर देणारी उपचारपद्धती उपयोगात आणावी. टॅनिंग सलून्स, स्टीम फेशिअल आणि उन्हात बराच काळ जाणे यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. पित्ताचा त्रास असलेल्यांच्या त्वचेत तेलाचे प्रमाण अधिक असते. आंघोळीकरता थंड पाणी वापरावे. पण बर्फासारखे थंड पाणी वापरू नयेत. जळजळीत, उष्ण अन्नपदार्थ टाळावेत, उन्हात व्यायाम करू नये. सिंथेटिक रसायने, प्रिझवर्हेटिव्ह आणि अन्य परिणाम करणारे घटक टाळावेत.

दिवसातून 2-3 वेळा हिरव्या चण्याची पावडर आणि बेसन (समप्रमाणात) पाण्यात मिसळून चेहरा धुवावा. आंघोळीपूर्वी अर्धा तास चेहऱ्यावर अर्धा चमचा लिंबू आणि काकडीचा रस यांचे मिश्रण लावावे.
शक्‍य असेल तेव्हा मेकअप टाळावा. चेह-यावरील छिद्रे न बुजवणारा पाण्यावर आधारित मेकअप करावा.

पपया, मध, दूध, दुधाची पावडर यांची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी आणि पंधरा मिनिटांनी चेहरा धुवावा.

कडुनिंबाच्या पानांची पेस्ट (25) करा आणि मधात (2 चमचे) मिसळून फेस पॅक म्हणून लावावा. सुकण्यापूर्वी पॅक काढून टाकावा.

आंघोळीपूर्वी मध आणि दह्याचे मिश्रण करून बॉडी मसाज करावा. ङ सहजगतीने पचण्याजोगे अन्न वापरावे. यात जुने धान्य, तूप घातलेली सूप्स, सुके मांस, डाळी, मध, खडे मीठ, पिपली, गोड, आंबट आणि खारट, भाज्या/ डाळी यांचे कमी तिखट सूप याचे सेवन करावे.

काय टाळाल?

दिवसाची झोप
अतिश्रम
अतिरिक्‍त आद्रता टाळा आणि स्वत:ला उबदार वातावरणात ठेवा.

थंडीत काय कराल?

थंडीत आपल्या हातापायाची त्वचा सुरक्षित ठेवण्याकरता आज सौंदर्यक्षेत्रात मेनिक्‍युअर, पेडिक्‍युअर या ट्रिटमेंटच्या पलीकडे जाऊनही काही नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत. नावीन्यपूर्ण ट्रिटमेंट केल्या जात आहेत.

फिश पेडिक्‍युअर, ऑइल मेनिक्‍युअर तसंच अनेक प्रकारच्या स्पा थेरपीज अशा वैविध्यपूर्ण ट्रिटमेंट प्रत्येक सलोनमध्ये आपल्याला सहज दिसून येतात. पण वेळेअभावी तासन्तास सलोनमध्ये बसून या थेरपीजचा आनंद आपल्याला घेता येत नाही.

आपल्या स्वयंपाकघरामध्ये इतक्‍या सा-या गोष्टी असतात, ज्याचा वापर आपण अशा वेळी करू शकतो. पण या गोष्टींचा आपल्याला साफ विसर पडतो. या वस्तूंपासूनच आपण असे काही स्क्रबर्स, पॅक्‍स आणि लोशन बनवू शकतो ज्यामुळे आपल्या सौंदर्यात भर घालणा-या हातापायांच्या त्वचेची काळजी घरच्या घरी घेणं सोपं आहे.

एका प्लॅस्टिकच्या भांड्यात दोन कप थोडं कोमट दूध घेऊन त्यात एक चमचा मीठ घालावं अणि हे मिश्रण स्क्रबरसारखं 5-7 मिनिटे हातापायांना लावल्यास त्वचेवरील मृतपेशी (डेड सेल) निघण्यास मदत होते. त्यानंतर मॉश्‍चराइजर नक्की लावावं.

2/3 कप गुलाब पाणी, 1/3 कप ग्लिसरीन, एक चमचा लिबांचा रस एकत्रित करून हे मिश्रण एका बाटलीत भरून कोरड्या आणि स्वच्छ जागेत ठेवावे आणि आठवड्यातून एकदा हातापायांना लावावं. त्यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि कोरडेपणादेखील कमी होतो.

अर्धा कप संत्र्याचा रस, एक चमचा मध, हे मिश्रण 10 मिनिटे हातापायांना लावून ठेवावं. नखांवर हे मिश्रण योग्य पद्धतीने आणि अधिक प्रमाणात जरी लावलं तरी नखं चमकदार दिसतात.

एक केळं, एक चमचा मध आणि लिंबांच्या रसाचे थेंब हे मिश्रण क्रीमसारखं दिसेल अशाप्रकारे एकजीव करून घ्यावं. या क्रीमने मसाज करावा. शक्‍य झाल्यास दोन तास तसंच हातापायांवर ठेवावं. अन्यथा 15-20 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाकावं. त्वचेच्या कोरडेपणावर ही क्रीम खूप फायदेशीर ठरते.

मिनरल ऑइल किंवा कॅस्ट्रोल ऑइल (एरंडेल तेल), ग्लिसरीन, आपल्या आवडीचे बॉडी लोशन/मॉश्‍चरायझर इत्यादींचे समप्रमाणातील मिश्रण एकत्र करून ते एका बाटलीत भरून ठेवायचे. अंघोळ झाली की लगेच थोडेसे हातावर घेऊन जिथे जिथे राठ त्वचा आहे तिथे लावावे, लावताना ते त्वचेत चांगले जिरले पाहिजे. (मिनरल ऑइल कुठल्याही सुपरमार्केटमध्ये लॅक्‍सेटिव्ह सेक्‍शनमध्ये मिळते.)

अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे फ्रेश क्रीम एकत्र करून हे मिश्रण 15 मिनिटे लावून ठेवावं आणि नंतर कोमट पाण्याने धुवावं, हे मिश्रण लावल्यामुळे तुमची त्वचा खूप मऊ-मुलायम होते.
एक अंडं, एक चमचा बदाम तेल आणि थोडंसं गुलाब पाणी एकत्र करून हे मिश्रण 10-15 मिनिटे लावल्यास त्वचेला टायटनिंग आणि पोषण मिळतं.

एक चमचा बदाम तेलात तीन चमचा साखर घालावी. गरज वाटल्यास तेलाचं प्रमाण वाढवू शकता. हे मिश्रण स्क्रबरसारखं 5-7 मिनिटे लावून ठेवावं. नंतर बॉडी लोशन नक्की वापरा.

एक चमचा (बेबी, ऑलिव, बदाम, तिळाचं) यांपैकी कोणतंही तेल, एक चमचा लिबांचा रस, एक चमचा मध.. हे मिश्रण पायाच्या भेगांवर लावल्यावर आराम मिळतो.

कोमट पाण्यात जाड मीठ किंवा एक लिंबू पिळून त्यात 10 मिनिटे पाय ठेवल्यास देखील खूप फायदा होतो. लिबांचा रस आणि पपईचा गर एकत्र करून 10 मिनिटे लावल्यास पायाच्या भेगा कमी होण्यास मदत होते.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyafitnesshealth
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar