आजकाल मधुमेह असलेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बदलती जीवनशैली आणि जेवणाच्या चुकीच्या वेळा, जागऱण, कमी झोप या सर्व कारणांमुळे मधुमेहाचा आजार वाढत चालला आहे. मधुमेहामुळे लठ्ठपणा, किडनीच्या समस्या यांसारखे त्रास सुरू होतात. मात्र, मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यात कांदा चांगला फायदेशीर आहे. कांद्यामध्ये फ्लेवेनॉइड्सच प्रमाण आढळून येत. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यात कांदा मदत करतो.
कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते –
कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक आढळून येते. कांद्याचे सेवन केल्यामुळे साखरचे रक्तात मिसळण्याची प्रक्रिया मंद होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. आपल्या शरिरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास कांदा फायदेशीर ठरतो. ज्यामुळे आपले पोट साफ आणि स्वस्थ राहण्यास मदत होते. मधुमेहाच्या रूग्णांमध्ये कफची समस्या असते त्यांनी तर कांद्याचे सेवन जरूर करावे. वेगवेगळे सूप्स, सलॅड आणि सॅंडविच यांमध्ये कांद्याचा वापर करून तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता.