ड्रायफ्रूट्स खायला सगळ्यांनाच आवडत. बदाम, काजू, मनुके यांचे अनेक फायदे आपल्याला होतात. अनेक पदार्थांमध्ये तसेच स्वीटडीशमध्ये यांचा वाप हमखास केला जातो. त्यामुळे ड्रायफ्रूट्सचा आहारात समावेश जरूर करावा. चला तर मग जाणून घेऊयात ड्रायफ्रूट्स खाण्याचे फायदे…
ड्रायफ्रूट्स खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे –
शरिरात ताकद निर्माण होते –
रोजच्या आहारात बदाम, काजू, मनुके यांचा समावेश केल्यास शरिराला ताकद मिळते. जर तुम्हाला कधी चक्कर आली तर हे काजू-बदाम खा त्याने चक्कर येणे थांबेल, त्यामुळे काजू-बदाम जवळ बाळगा. या ड्रायफ्रूटसमध्ये कोलेस्ट्रॅालचे प्रमाण कमी असते, त्यामुळे हृदयाच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींनी याचे जरूर सेवन करावे.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर –
ड्रायफ्रूटसमध्ये साखरेचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे नियमित यांचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.
कफपासून आराम –
जर तुम्हाला कफची समस्या असेल तर तुम्ही काजू-बदाम मनुके यांचे अवश्य सेवन करावे. कफची समस्या दूर करण्यासाठी अनेक जण विविध औषधांचे सेवन करतात. शक्यतो काजू-बदाम, मनुके रात्री भिजवावे आणि सकाळी खावेत याने कफची समस्या दूर होते.