Thursday, September 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

Acidity : तुम्हाला सुद्धा रोज पित्त होतं? तर ही बातमी नक्की वाचा, लगेच पडेल आराम !

by
August 31, 2026
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Acidity : बदलती जीवनशैली, अनियमित आहार, तिखट-तेलकट पदार्थांचे अतिसेवन आणि ताणतणाव यामुळे आम्लपित्ताची समस्या वाढू शकते. विशेषतः बाहेरचे मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा जेवणाच्या वेळा चुकल्यानंतर अनेकांना या त्रासाला सामोरे जावे लागते.

अशावेळी काही जण घरगुती उपायांचा आधार घेतात. आवळा, मूग-भात, कोकम, दूध आणि पिकलेले केळ यांसारख्या पदार्थांचा पारंपरिक पद्धतीने वापर केला जातो. मात्र, पित्ताचा त्रास वारंवार होत असल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्यामागील कारण समजून घेणे आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

पित्त होण्याची करणे कोणती?

चुकीचा आहार :-

तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, लाल मांस, ह्या प्रकारचे अन्नपदार्थ आपण खाल्ले असतील तर हमखास पित्त होऊन छातीत जळजळ होते.

अपेय पान
आयुर्वेदात अपेय पान वर्ज्य सांगितले आहे. चहा, कॉफी, अल्कोहोल, निकोटिन युक्त पदार्थ म्हणजेच दारु, सिगारेट सतत सेवन केल्यास पित्त वाढते.

ऊन सहन न होणे
जर आपण तीव्र उन्हात काम करत असाल आणि तुमच्या शरीराला ऊन सहन झाले नाही तर शरीरातील पित्त वाढू लागते.

भावनिक ताण
कोणत्याही गोष्टीचा अति विचार करून भावनिक ताण तणाव आला असेल तर पित्त दोष उद्भवतो.

पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय :-

अमृत फळ आवळा
चवीला तुरट असा आवळा कफ आणि पित्त प्रकोप कमी करणारा आहे. त्यामधील व्हिटॅमिन सी अन्ननलिका, पोट स्वच्छ ठेवते. पित्ताचा त्रास होत असेल तर कच्चा आवळा थोडे मीठ लावून खाऊ शकता. आवळ्याचे चूर्ण करून ते कोमट पाण्यातून घेऊ शकता. हा उपाय काही दिवस सकाळी केल्यास पित्त विकार कमी होतो.

मूग आणि तांदूळ
जर तुम्हाला पित्त झाल्याने भूक लागत नसेल किंवा जळजळ होत असल्याने काय खावं कोणता आहार घ्यावा हे समजत नसेल तर मुगाचं साधं वरण आणि भात त्यावर तूप घालून काही दिवस घ्यावा. मूग पित्तशामक आहे. तसेच साधा मूग आणि तांदळाचा नीर डोसा देखील खाऊ शकता. तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

उष्ण आलं आणि रसदार लिंबू
आपल्या मनात येईल आलं उष्ण तिखट आहे पण पूर्वीपासून आल्याचा पित्तशामक म्हणून वापर होतो. आल्यातील तिखट पाचक रसाने वाढलेले आम्लपित्त कमी होते. लिंबाचा रस त्यातील व्हिटॅमिन सी मुळे पित्तशय स्वस्थ होते. जेवणात आलं घ्यावं. तसेच आल्याचा तुकडा किसून मीठ, लिंबाचा रस, किंचित साखर घालून हे सरबत चमचाने थोडथोड पित राहावं.

कोकम
आमसूल किंवा कोकम काही घरात सहज उपलब्ध असते. त्यामधे देखील प्रचुर व्हिटॅमिन सी असते. कोकम सरबत किंवा आमसूल सेवन करून पित्त शमंत होते.

थंड दूध
थंड दुध वाढलेली जळजळ कमी करते. थोडेसे थंड दूध किंचित साखर घालून प्यायल्यास पित्त कमी होते. छाती आणि पोटातील जळजळ थांबते.

पिकलेले केळे
केळ्यातून शरीराला खूप जास्त पोटॅशियम मिळतं. त्यामुळे केळ खाल्ल्यास पोटातील आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच शरीराल फायबर मिळते जे पचन क्रिया वेगवान करते.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar