मासिक पाळीबाबत लोकांमध्ये पूर्वीपासूनच वेगवेगळे गैरसमज आहेत. भारतीय समाजात पाळी येणे हीनपणाचे समजले जाते. सुरुवातीला तिला विश्रांती मिळावी म्हणून बाजूला बसवण्याची प्रथा सुरू झाली. मात्र पुढे पाळीच्या या काळात ती चक्क अस्पृश्य, अपवित्र मानली जाऊ लागली. अनेक बंधने तिच्यावर लादली जाऊ लागली.
काही मंदिरांमध्ये स्त्रियांना दर्शन घेण्यास बंदी आहे. मासिक पाळी असण्याच्या वयात काही ठिकाणी स्त्रियांना देवळात प्रवेश करण्यास मज्जाव आहे. ज्या गोष्टीमुळे आज मानवजात अस्तित्वात आहे, त्याच गोष्टीविषयी एवढा तिरस्कार समाजात दिसून येतो. मासिक पाळीवरून समाजात स्त्रियांचा तिरस्कार केला जातो मात्र हा तर निसर्गधर्म आहे. ( sexual intercourse during menstrual cycle)
मासिक पाळी हा नव्या जिवाला जन्म देण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा भाग. तो वाईट कसा? अपवित्र कसा? सोबतच आणखी एक प्रश्न म्हणजे मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवावे की नाही?
चला जाणून घेऊ याबाबत….
१) मासिक पाळी असताना शारीरिक संबंध ठेवल्याने महिला किंवा पुरुषाला आरोग्यासंबंधी काही नुकसान होतं. पण हे गरजेचं आहे की, दोघांचीही सहमती हवी आणि आवश्यक ती काळजी घ्यावी.
२) मासिकपाळी दरम्यान सेक्स केल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता तशी विरळच आहे. स्त्री शरीरात निरुपयोगी अंड जरी राहिले असले तरीही या काळात गर्भाशयातील त्वचेचे अस्तर बाहेर फेकले जाण्याची प्रक्रिया सुरू असते. तसेच गर्भधारणेसाठी आवश्यक असलेली हार्मोन्स या काळात शरीरात उपलब्ध नसतात त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते. ( sexual intercourse during menstrual cycle)
३) मासिक पाळीदरम्यान गर्भधारणेची शक्यता कमी असली तरी पूर्णपणे नाकारता येत नाही. अशावेळी कंडोमचा वापर केलेला कधीही चांगला. त्यासोबतच या दरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास स्वच्छतेचीही पूर्ण काळजी घेणे गरजेचे आहे.
४) तज्ञ सांगतात, मासिकपाळी दरम्यान स्त्रिया मानसिक व शारिरीक बदलांमधून जात असतात. सतत मूड बदलणे, पोटात दुखणे, कंबरदुखी यासारख्या समस्यांना तोंड देत असतात असतात. मात्र पाळीदरम्यान स्त्रीयांसोबत त्यांच्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्यास होणार्या वेदना व त्रासदेखील कमी होतो. ( sexual intercourse during menstrual cycle)