काकडी- कोरफड फेसपॅक
त्वचेला सुंदर, मुलायम ठेवण्यासाठी आपण विविध उपाय करतो. मात्र तुम्ही कधी काकडी- कोरफडचा फेसपॅक ट्राय केलाय? मग रूक्ष झालेली त्वचेला सतेज करण्यासाठी पिंपल्सपासून सुटका करण्यासाठी तुम्ही काकडी- कोरफडचा फेस मास्क नक्कीच वापरू शकता.कोरफड त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार आहे. सौंदर्य उत्पादनात कोरफडचा उपयोग केला जातो.
कोरफडची प्रकृती शीत असून ह्यात जीवन सत्व आणि खनिज पदार्थ जास्त प्रमाणात असतात.यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर त्वचेत असलेले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
आयुर्वेदिक सौंदर्य उपचारासाठी कोरफड आणि काकडीच्या रसाचा वापर करावा. चेहऱ्याला सुंदर, सतेज करण्यासाठी काकडी आणि कोरफड पेस्ट. काकडी आणि कोरफड मिसळून पेस्ट बनवा. रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मॉलीश करावी. रात्री तसेच ठेवावे. सकाळी उठून साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्यावा.