साहित्य : एक वाटी हिरवी मिरची, मीठ, लिंबू,
कृती : हिरवी मिरची व साधारण एक चहाचा चमचा मीठ घालून मिक्सरवर बारीक वाटावे. त्यात लिंबू पिळावे. आठ दिवस टिकतो. याचा उपयोग आयत्या वेळेस घरात मिरच्या नसतील तर कुठल्याही कालवणात घालण्यास उपयोगी पडतो. तसेच त्यात दाण्याचे कूट किंवा ओले खोबरे अगर कोरडे खोबरे, कोथिंबीर घालून दहात कालवण्याची चटणी करता येते. भाकरीबरोबर अगर थाली पिठाबरोबर नुसता खडासुद्धा चवीला छान लागतो. तोंडाला झणझणीत छान चव लागते.
लोणचे कसे तयार करावे ? जाणून घ्या सोप्या रेसिपी
चमत्कारीक गुणधर्म असलेली लसूण- जवस चटणी रेसिपी