मुंबईसारख्या राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी इतर कारणांसाठी येणाऱ्या लोकांप्रमाणेच विविध आजारांवर उपचार करून घेण्यासाठी येथील मोठ्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्यांची संख्या कमी नाही. मुंबईतल्या रुग्णांना किमान स्वत:च्या ओळखीने अथवा येथील भौगोलिक तसेच इतर बाबींची माहिती असल्यामुळे एखाद्या इमर्जन्सी केसमध्ये रक्त मिळवण्यासाठी फार कसरत करावी लागत नाही. ( blood donor )
परंतु शहराच्या बाहेरून येणाऱ्या रुग्णांसाठी हा एक मोठा प्रश्नच आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून कुर्ल्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी मएम हेल्थफ नावाचे एक मोबाईल ऍप तयार केले आहे. जनकल्याण समितीच्या तरूणांनी बनवलेल्या या ऍपद्वारे अनेक गरजुंना रक्त उपलब्ध होणे सोपे होणार आहे. यामध्ये मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आता एका क्लिकवर पाच हजार रक्तदात्यांची नावे उपलब्ध होणार आहेत.
याशिवाय गरजू रुग्णांना बऱ्याचदा फ्रेश रक्त हवे असते. अशा वेळी रक्तदात्याने प्रत्यक्ष रक्तदान करणे आवश्यक असते. हे लक्षात घेऊन कुर्ला येथील आरएसएसच्या तरूणांनी गेले वर्षभर कुर्ला परिसरात 35 ठिकाणी विविध मंडळांच्या सहकार्याने पाच हजार रक्तदात्यांची यादी बनविण्याचे काम केले आहे. ( blood donor )