Thursday, August 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

A Journey Called Donald : टिम कुक आणि ट्रम्प यांच्यातील ‘डोनाल्ड’ कनेक्शन.! दोघांच्या नावामध्ये ‘डोनाल्ड’ का आहे? वाचा भन्नाट स्टोरी…

by
April 23, 2026
in लाईफस्टाईल
A A
A Journey Called Donald : टिम कुक आणि ट्रम्प यांच्यातील ‘डोनाल्ड’ कनेक्शन.! दोघांच्या नावामध्ये ‘डोनाल्ड’ का आहे? वाचा भन्नाट स्टोरी…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

– ऋषिकेश जंगम

Donald : तंत्रज्ञान विश्वात ज्या क्षणाची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होती, तो क्षण अखेर आला आहे. जगातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या ‘अँपल‘चे मार्गदर्शक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ‘टीम कुक‘ यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे.

त्यांच्या या निर्णयामुळे जगभरातील टेक-प्रेमींमध्ये खळबळ उडाली असली, तरी कुक यांनी त्यांच्या पत्रातून हा निरोप नसून एका नव्या अध्यायाची सुरुवात असल्याचे संकेत दिले आहेत. टीम कुक यांनी कंपनीला लिहिलेल्या पत्रात त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

त्यांनी स्पष्ट केले की, 1 सप्टेंबरपासून ते अधिकृतपणे CEO पदावरून पायउतार होतील. मात्र, ते कंपनी पूर्णपणे सोडत नसून ‘एक्झिक्युटिव्ह चेअरमन’ या भूमिकेतून अँपलला दिशा देण्याचे काम सुरूच ठेवतील.

मात्र, टीम कुक हे नाव जगभर परिचित असलं तरी त्यांचं पूर्ण नाव ‘टिमोथी डोनाल्ड कुक’ असं आहे. डोनाल्ड हा शब्द त्यांच्या नावात का आहे? याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. तर याच बद्दल आपण जाणून घेऊयात….

‘डोनाल्ड’ नावाचा रंजक इतिहास :

‘डोनाल्ड‘ या नावाचा इतिहास आणि त्याचा प्रभावशाली वारसा समजून घेण्यासाठी आपल्याला स्कॉटलंडच्या डोंगररांगांपासून ते आधुनिक काळातील जागतिक राजकारणापर्यंतचा प्रवास पाहावा लागेल.

नावाचा उगम आणि अर्थ :

‘डोनाल्ड’ हे नाव मूळ स्कॉटिश-गेलिक (Scottish-Gaelic) नावाचे ‘डोनल’ (Domhnall) इंग्रजी रूप आहे. हे नाव दोन जुन्या शब्दांच्या संयोगातून बनले आहे.

Dumno: याचा अर्थ ‘जग’ किंवा ‘विश्व’ (World).

Val: याचा अर्थ ‘सत्ता’ किंवा ‘नियम’ (Rule/Wield).

त्यामुळे, ‘डोनाल्ड’ या नावाचा एकत्रित अर्थ “जगाचा स्वामी” (Ruler of the World) असा होतो. हे केवळ नाव नसून ती एक शक्तिशाली पदवी मानली जात असे. “जगाचा नेता” किंवा “विश्वाचा शासक” असा देखील याचा अर्थ होतो. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर, महाराष्ट्रात अनेक जण आपल्या नावापुढे ‘पाटील’ लावतात तसंच काहीस इथे आहे.

ऐतिहासिक वारसा :

हे नाव जगप्रसिद्ध होण्यामागे स्कॉटलंडच्या राजघराण्याचा मोठा वाटा आहे. ते कसे याबद्दल आपलं पाहुयात…

– राजा डोनाल्ड पहिला (Donald I): इसवी सन 858  मध्ये गादीवर आलेले हे राजा आधुनिक स्कॉटलंडच्या संस्थापकांपैकी एक मानले जातात. त्यांनी स्कॉटिश कायद्यांची आणि राज्याची घडी बसवली.

– राजा डोनाल्ड दुसरा: त्यांनी वायकिंग्स टोळ्यांशी लढा देऊन स्कॉटलंडचे संरक्षण केले. त्यांच्या शौर्यामुळे हे नाव ‘योद्धा’ आणि ‘रक्षक’ या अर्थाने ओळखले जाऊ लागले.

– ‘क्लान डोनाल्ड’ (Clan Donald) : मध्ययुगीन काळात स्कॉटलंडमध्ये ‘क्लान डोनाल्ड’ हा सर्वात मोठा आणि शक्तिशाली वंश होता. यांना ‘लॉर्ड ऑफ द आयल्स’ (Lords of the Isles) म्हटले जात असे. हे लोक स्कॉटलंडच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि बेटांवर राज्य करत. त्यांचा प्रभाव इतका मोठा होता की, स्कॉटलंडच्या मुख्य राजालाही त्यांच्याशी तह करावा लागत असे.

आधुनिक काळातील प्रभाव :

आज ‘डोनाल्ड’ हे नाव केवळ स्कॉटलंडपुरते मर्यादित राहिलेले नाही. ते नेतृत्व आणि यशाचे प्रतीक बनले आहे. ‘डोनाल्ड ट्रम्प’ यांच्यामुळे हे नाव आधुनिक जागतिक राजकारणात सर्वोच्च स्थानी पोहोचले आहे. जर आपण टीम कुक यांच्या आयुष्याकडे पाहिल्यास, त्यांच्या नावाचा हा ‘जगाचा नेता’ हा अर्थ त्यांच्या कर्तृत्वातून सार्थ ठरलेला दिसतो.

टीम कुक यांचा प्रवास :

1998 मध्ये जेव्हा टीम कुक अँपलमध्ये रुजू झाले, तेव्हा कंपनी आर्थिक गर्तेत होती. स्टीव्ह जॉब्स यांनी त्यांच्यावर विश्वासाने ऑपरेशन्सची जबाबदारी सोपवली. कुक यांनी आपल्या व्यवस्थापन कौशल्याने अँपलची पुरवठा साखळी (Supply Chain) इतकी मजबूत केली की, कंपनी अल्पावधीतच नफ्यात आली.

दरम्यान, 2011 मध्ये जॉब्स यांच्या निधनानंतर ‘अँपल संपली’ असे भाकीत अनेकांनी वर्तवले होते. मात्र, कुक यांनी आपल्या शांत आणि संयमी नेतृत्वाने सर्वांना चुकीचे ठरवले.

त्यांच्या कार्यकाळात अँपलची बाजारपेठ 3 ट्रिलियन डॉलर्सच्या पार गेली. अँपल वॉच, एअरपॉड्स आणि व्हिजन प्रो यांसारख्या क्रांतिकारी उत्पादनांची निर्मिती झाली. कंपनीने ‘पर्यावरण रक्षण’ आणि ‘वापरकर्ता गोपनीयता’ (Privacy) याला सर्वोच्च प्राधान्य दिले. आणि आज ही कंपनी सर्वोच्च शिखराव आहे.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar