Noise Vortex Plus : तुम्ही कमी किमतीत उत्तम फीचर्स असलेले स्मार्टवॉच शोधत असाल, तर नॉइज व्होर्टेक्स प्लस स्मार्टवॉच तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. याचे लॉंचिंग नुकतच करण्यात आले आहे. यामध्ये कंपनीने अनेक आधुनिक फिचर्स दिले आहेत. चला जाणून घेऊया त्याचे स्पेसिफिकेशन आणि किंमत नेमकी किती आहे.
मेश मेटल, लेदर आणि सिलिकॉन पट्ट्यांसह हे स्मार्टवॉच लॉंच करण्यात आले आहे. यात 1.46 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे.हे स्मार्टवॉच 100 ॲनिमेटेड वॉच फेसला सपोर्ट करते.यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह नॉईज ट्रू सिंक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यात v5.3 कनेक्टिव्हिटी देखील आहे.
हेल्थ फीचर्स म्हणून यात २४x७ हार्ट रेट मॉनिटर, SpO2 मापन, स्लीप ट्रॅकिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि फीमेल सायकल ट्रॅकर देण्यात आले आहेत.यात क्रीडाप्रेमींसाठी अनेक स्पोर्ट्स मोड आहेत. तसेच याची बॅटरी 7 दिवसांपर्यंत बॅकअप देण्यास सक्षम आहे.स्मार्टवॉचला पाणी आणि धूळ प्रतिरोधक बनवण्यासाठी IP 68 ची मानक रेटिंग देण्यात आली आहे.
Noise Vortex Plus स्मार्टवॉचमध्ये अनेक कलर पर्याय आणि विविध बेल्ट देण्यात आले आहेत. यामध्ये विंटेज ब्राउन, जेट ब्लॅक, स्पेस ब्लू, सिल्व्हर ग्रे आणि रोझ पिंक यांचा समावेश आहे. याची विक्री ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे Amazon आणि gonoise.com वरून खरेदी केले जाऊ शकते. याची किंमत 1,999 रुपये आहे.
The post 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप.. Amoled डिस्प्ले.. ! ‘या’ खास फीचरसह लॉंच झाले स्वस्तात मस्त SMARTWATCH appeared first on Dainik Prabhat.