मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. 49 वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत. अभिनेत्री नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. फॅन्स देखील या ग्लॅमर्स फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, 49 वर्षांची ही अभिनेत्री अजूनही 24 वर्षांच्या मुलींपेक्षा सुंदर दिसते. मलायकाची स्कीन देखील कायमच ग्लो करते. अनेकांना मलायका अरोरा हिच्यासारखे फीट राहण्याची इच्छा आहे. कारण सध्याच्या जीवनशैलीमध्ये वाढलेले वजन ही अनेकांची समस्या बनली आहे.
त्यामुळे विशेष: महिलांना कायमच हा प्रश्न पडतो की? आपण देखील अभिनेत्री मलायका सारखे सुंदर आणि फिट दिसावे. परंतू वजन कमी करण्यासाठी आणि फीट राहण्यासाठी मलायका अरोरा एक खास पेय दररोज घेते. स्वतः अभिनेत्रीने एका कार्यक्रमात आपल्या फिटनेचा राज हेच पेय असल्याचे सांगितले आहे.
मलायका वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘मेथी, अजवाईन आणि जिरे’ यांचे पेय दररोज सकाळी उपाशी पोटी घेते. हे सर्व अगोदर रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवते आणि सकाळी उकळून पिते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. आणि तुमची हेल्थ आणि स्किन देखील चमकते. मलायका ही बॉलिवूड मधील नामांकित अभिनेत्री असून, सोशलवर देखील तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.
The post 49 वर्षांची मलायका अजूनही 24 वर्षांच्या मुलींपेक्षा सुंदर का दिसते? दररोज पिते ‘हे’ खास पेय… appeared first on Dainik Prabhat.