Friday, October 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

17 मे : ‘वर्ल्ड हायपरटेंशन डे’

by
May 18, 2023
in आरोग्य वार्ता
A A
17 मे : ‘वर्ल्ड हायपरटेंशन डे’
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – मधुमेह आणि उच्च रक्‍तदाब या दोन्ही आजारांना “सायलेंट किलर’ म्हणून संबोधण्यात येते. मुलांमध्ये असे आजार वाढत आहेत, हे चिंताजनक आहे. जीवनशैली सुधारत “प्री-हायपरटेंशन’वर नियंत्रण ठेवता येणार आहे.

17 मे रोजी साजरा होणाऱ्या जागतिक उच्च रक्‍तदाब दिनानिमित्त किशोरवयीन मुलांमध्ये वाढत्या उच्चरक्‍तदाबाच्या समस्यांबाबत तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. एखाद्या व्यक्‍तीचा नियमित रक्‍तदाब प्रत्येक निरीक्षणादरम्यान 120 ते 139 च्या आसपास राहिला तर त्याला “प्री हायपरटेन्शन’ असे म्हणतात. साथीच्या रोगानंतर, असंसर्गजन्य रोगांवर लक्ष केंद्रित केले आहे. यावर्षीची “जागतिक उच्च रक्‍तदाब दिन 2023′ ची थीम ही “तुमचा रक्‍तदाब अचूकपणे मोजा, त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घकाळ जगा’ अशी आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये उच्च रक्‍तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. चिंतेची बाब म्हणजे हृदयविकाराचा झटका कमी वयाच्या लोकांना मोठ्या प्रमाणात येत आहे. जसे की हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि किडनीचे आजार. यासह धूम्रपान किंवा मधुमेह यांसारख्या इतर रोगांमुळे आणि हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहासामुळेही याचा धोका वाढतो. अशी माहिती कार्डिओलॉजिस्ट डॉ. जगजीत देशमुख यांनी दिली.

उच्च रक्‍तदाब कोणत्याही संसर्गजन्य रोगांना आमंत्रण देऊ शकतो. दीर्घकालीन आणि शाश्‍वत जीवनशैलीतील बदल आणि आरोग्यदायी जीवनशैलीबद्दल जागरुकता निर्माण करणे हे उच्चरक्तदाब रोखण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

प्री-हायपरटेंशनचे निरीक्षण करणे आणि भविष्यात हा आजार टाळण्यासाठी व्यवस्थापित करणे आवश्‍यक आहे, अन्यथा गंभीर गुंतागुंत होऊ शकते. 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व प्रौढांपैकी निम्म्या प्रौढांना प्री-हायपरटेंशन किंवा उच्च रक्‍तदाब असतो. हे प्रमाण अति कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये सामान्य व्यक्तींपेक्षा जास्त आहे, असे फिजिशियन डॉ. सुधा देसाई यांचे म्हणणे आहे.

आमच्या हॉस्पिटलमध्ये गेल्या काही महिन्यांत आढळलेल्या केसेसमध्ये 30% वाढ झाली आहे. गेल्या 4-5 महिन्यांत आम्ही हा ट्रेंड पाहिला आहे. प्री-हायपरटेंशनची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, म्हणूनच त्याला “सायलेंट किलर’ असे संबोधले जाते. काही लोकांना डोकेदुखी, चक्कर येणे किंवा हलके डोके जाणवू शकते. आत्तापर्यंत आम्हाला भेटायला आलेल्या 10 किशोरांपैकी या लक्षणांसह, तिघांना प्री-हायपरटेंशनचे निदान झाले आहे. अशी माहिती कार्डिओलॉजिस्ट डॉ. विक्रांत खेसे यांनी दिली.

कारणे
आनुवंशिकता
धुम्रपान आणि मद्यपान
जास्त मीठ किंवा मसालेदार अन्न खाणे
लठ्ठपणा किंवा सतत वजन वाढणे
मानसिक आणि शारीरिक ताण
हृदय समस्या
मूत्रपिंड समस्या

उपाय
संतुलित आहार : ज्यात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने आणि निरोगी चरबी यांचा समावेश असेल. प्रक्रिया केलेले आणि जास्त साखरयुक्‍त पदार्थांचे सेवन मर्यादित करणे.
व्यायाम : नियमित शारीरिक व्यायाम महत्त्वाचा आहे. आठवड्यातून किमान पाच वेळा 45 मिनिटे वेगाने चालणे.
तणाव व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे : किशोरांना ध्यान, दीर्घ श्‍वास, योगासने आवश्‍यक.
रक्‍तदाब पातळीचे निरीक्षण करणे : नियमित निरीक्षण केल्याने किशोरवयीन मुलांमध्ये प्री-हायपरटेन्शन लवकर ओळखण्यात मदत होऊ शकते, ज्यामुळे उपचार लवकर मिळू शकतात.
वजन नियंत्रिण : जास्त वजन किंवा लठ्ठपणा असलेल्या किशोरवयीन मुलांसाठी वजन कमी केल्याने रक्‍तदाब पातळी कमी होण्यास मदत होते.

The post 17 मे : ‘वर्ल्ड हायपरटेंशन डे’ appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar