Tuesday, May 12, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

15 वर्षीय मुलगी 12 वर्षाच्या मुलासोबत ‘फरार’; घरच्यांसह पोलिसांची डोकेदुखी वाढली

by
October 21, 2024
in लाईफस्टाईल
A A
15 वर्षीय मुलगी 12 वर्षाच्या मुलासोबत ‘फरार’; घरच्यांसह पोलिसांची डोकेदुखी वाढली
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

नोएडा  – नोएडा येथील एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने घरच्यांची आणि पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. घरा शेजारी राहणाऱ्या एका १२ वर्षांच्या मुलासोबत ही मुलगी फरार झाली आहे. या पूर्वी दोन वेळा ही मुलगी या मुलासोबत पळून गेली होती. मात्र, पोलिसांनी दोन्ही वेळेला मुलीचा व मुलाचा शोध घेऊन तिला परत पालकांच्या स्वाधीन केले होते. मात्र, पुन्हा ही मुलगी मुलासोबत फरार झाली आहे.

नोएडाच्या सेक्टर ५८ मधील बिशनपुरा गावात ही घटना घडली. मुलीच्या वाईट सवयीमुळे कुटुंब नोएडा सोडून बिहारला जाण्याच्या तयारीत असताना अल्पवयीन मुलगी ही घरातून पळून गेली. वडील रिक्षा नेण्यासाठी बाहेर गेले असताना यावेळी आई आणि लहान बहिणीला चकवा देऊन ती घरातून गायब झाली. शेजारी राहणारा १२ वर्षांचा मुलगा देखील घरातून बेपत्ता आहे. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा पोलिसांत धाव घेतली असून या मुलीचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा पोलिस गुंतले आहेत.

मूळचा बिहारच्या दरभंगा जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या तिच्या वडिलांनी सांगितले की, त्याला दोन मुली आहेत. मोठी मुलगी १५ वर्षांची तर धाकटी मुलगी १२ वर्षांची आहे. सुमारे ४ वर्षांपूर्वी ते मुलींना शिकवण्यासाठी नोएडाला आले होते. बिशनपुरा येथे खोली भाड्याने घेऊन ते या ठिकाणी राहत होते. पती-पत्नी एका खासगी कंपनीत काम करत असून कष्ट करून दोन्ही मुलींना शिकवत आहेत.

Join our WhatsApp Channel

The post 15 वर्षीय मुलगी 12 वर्षाच्या मुलासोबत ‘फरार’; घरच्यांसह पोलिसांची डोकेदुखी वाढली appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar