error: Content is protected !!
साहित्य
1 कप बेसन , 2 कप साखर , 1 कप पाणी , 3 कप तूप , चिमूटभर बेकींग सोडा
कृती
पॅनमध्ये एक कप तूप घेऊन मध्यम आचेवर गरम करा . जेंव्हा तूप व्यवस्थित तापेल तेंव्हा त्यात बेसन घालून काही मिनिटे बेसनाचा वास निघून जाईपर्यंत फ्राय करा .
दुसऱ्या पॅन मध्ये पाण्याबरोबर साखर उकळून साखरेचा पाक तयार करून घ्या . मग त्यात उरलेले तूप घालून गरम होऊ द्या मग फ्राय केलेले बेसन घालून ते घट्ट होईपर्यंत हलवत रहा . सतत हलवण्याने बेसनाच्या गुठळ्या होणार नाहीत . जेंव्हा तूप बाजूने सेपरेट होऊ लागेल तेंव्हा त्यात बेकिंग सोडा घालून हलवा .
मग सर्वत्र तूप लावलेल्या थाळीत हे मिक्श्चर हलकेच सगळी कडे एक सारखे पसरून गार करायला ठेवा . पूर्ण घट्ट होण्यापूर्वी आवडीप्रमाणे वड्या बनवण्यासाठी चाकूने काप करून घ्या . हा मूळ मैसूर पाक हा बाजारात मिळणाऱ्या मैसूर पाकपेक्षा वेगळा दिसतो . बाजारातील मैसूर पाक जाळीदार असतो .
error: Content is protected !!
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar