नवी दिल्ली – अभिनेत्री बिपाशा बसू हिने आपल्या मुलाला झालेल्या आजाराची माहिती नुकतीच सोशल मीडियावर प्रदर्शित केली होती. बिपाशा बसूच्या मुलाच्या हृदयाला छेद आहे आणि त्याच्यावर काही अवघड शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जन्माला येणाऱ्या दरहजार पैकी सहा मुलांच्या हृदयाला अशा प्रकारे छेद असू शकतो. गर्भारपणाच्या कालावधीमध्ये निष्काळजीपणा दाखवला किंवा काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचा त्रास होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे.
मातेच्या गर्भाशयात जर गर्भाचे व्यवस्थित पोषण झाले नसेल तर अशा प्रकारे गर्भाच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो. गर्भारपणात कालावधीमध्ये जर मातेने काही औषधे सेवन केली असती तर त्याचे साईड इफेक्ट म्हणून सुद्धा गर्भाच्या हृदयावर असा परिणाम होऊ शकतो, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे.
सर्वसाधारणपणे जन्माला आलेल्या 1000 पैकी आठ ते दहा बालकांना जन्मजात हृदयविकार असतो. त्यापैकी सहा बालकांच्या हृदयाला अशा प्रकारे छेद असू शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा जन्मजात अर्भकाच्या हृदयाला छेद आहे. हे अनेक वेळा लगेच कळू शकत नाही. काही वेळा तरुणपणामध्ये सुद्धा ही गोष्ट लक्षात येऊ शकते. त्यानंतर शस्त्रक्रिया करावी लागते. हृदयाला अशाप्रकारे छेद असण्याच्या आजाराची काही लक्षणे सांगण्यात आली आहेत. त्यामुळे वैद्यकीय व्यावसायिक अशा प्रकारची लक्षणे आढळली तर हृदयाची तपासणी करून घेऊन असा छेद आहे का? हे पाहतात आणि त्यानंतर उपचार सुरू केले जातात.
The post 1000 मुलांमागे 6 मुलांच्या हृदयाला छिद्र; गर्भारपणातील निष्काळजीपणा ठरू शकतो त्रासदायक! appeared first on Dainik Prabhat.
