बजारात सुकी अंजीर वर्षभर उपलब्ध असतात. ताज्या अंजीरप्रमाणेच सुकविलेल्या अंजीरलाही चांगली मागणी आहे. ताज्या अंजीरची चव सुक्या अंजीरपेक्षा वेगळी लागते. अंजीरचा थेट आहारात किंवा मिठाईत वापर होतो. अंजीरमध्ये व्हिटॅमिन “ए’,’सी’, आणि “के’ असतात. तसेच पोटॅशियम, कॉपर, झिंक, आयर्न, कॅल्शियम तत्वही असतात. अंजीरमध्ये नैसर्गिक शुगर असते.
1.अंजीरमध्ये कॅल्शियम घटक भरपूर प्रमाणात असल्याने हाडांना मजबुती मिळते.
2.अंजीरमध्ये फायबर असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. ताजे अंजीर सालीसकट खाल्ल्याने अधिक फायदा होतो. त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असतात. ताजे आणि सुकवलेले अंजीर दोन्ही कॉन्स्टिपॅशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत करते.
3.अंजीरमध्ये पोटॅशियम असते जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
4.अंजीरमध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिड असतात. हृदयाचे आजार आटोक्यात राहण्यास मदत होते.
5.गुडघ्याचं दुखणं कमी करण्यासाठी सुके अंजीर फायदेशीर आहे. दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी रोज 3-4 अंजीर खाणे फायदेशीर ठरते.
6.अंजीरमध्ये व्हिटॅमिन ‘इ’ आणि ‘के’ चांगल्या प्रमाणात आहे. जे केसांची नैसर्गिक चमक राखून ठेवते.
7.अंजीर हे एँटीऑक्साडेंटच प्रमुख स्त्रोत आहे. अंजीर खाल्ल्याने शरीरातील फ्री रेडिकल्स नष्ट करून वेगवेगळ्या आजारापासून बचाव करते.
डॉ आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886.