[[{“value”:”
नवी दिल्ली : देशातील 70 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना अंतर्गत 70 वर्षे आणि अधिक वय असलेल्या सर्व वरिष्ठ नागरिकांना विमा लागू करण्यास मंजुरी दिली आहे. याचा देशभरातील साडेचार कोटी कुटुंबातील सुमारे ६ ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या आरोग्य योजनेंतर्गत 70 वर्षे किंवा अधिक वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रति कुटूंब ५ लाख रुपये मोफत आरोग्य विमा मिळणार आहे. गरीब श्रीमंत सर्वच जण या योजनेअंतर्गत लाभार्थी असतील.
LIVE: Cabinet Briefing by Union Minister @AshwiniVaishnaw @PIB_India https://t.co/60XdytWJJ7
— Ministry of Information and Broadcasting (@MIB_India) September 11, 2024
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवार आयुष्मान भारत जन आरोग्य योजना अंतर्गत 70 वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षा कवच देण्यास मंजूरी दिली आहे.
रूग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध होणार –
PM-JAY अंतर्गत, लाभार्थीला रुग्णालयात कॅशलेस सुविधा मिळते. PM-JAY चा उद्देश उपचाराचा खर्च कमी करणे हा आहे. या योजनेत रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 3 दिवस आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 15 दिवसांपर्यंतचा संपूर्ण खर्च समाविष्ट आहे.
The post ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत आरोग्य विमा, सरकारने केली मोठी घोषणा appeared first on Dainik Prabhat.
“}]]