Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

१० वर्षीय मुलीला ‘अलेक्झा’ने दिलं जीवघेणं चॅलेंज; वेळीच आईचं लक्ष गेल्याने अनर्थ टळला…

by प्रभात वृत्तसेवा
December 30, 2021
in लाईफस्टाईल
A A
१० वर्षीय मुलीला ‘अलेक्झा’ने दिलं जीवघेणं चॅलेंज; वेळीच आईचं लक्ष गेल्याने अनर्थ टळला…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

हल्ली केवळ खिशातील फोनच नव्हे तर घरातील टीव्हीपासून ते स्पिकरपर्यंत सर्वच ‘स्मार्ट’ झालं आहे. स्मार्ट फोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट स्पीकर, स्मार्ट कार अशा उपकरणांनी आपलं आयुष्य व्यापून टाकलं आहे. मात्र आपलं आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी बनवण्यात आलेली ही उपकरणं कधीकधी आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतात. याचीच प्रचिती अलेक्झा स्पीकर वापरणाऱ्या एका १० वर्षीय मुलीला आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, या १० वर्षीय मुलीने अमेझॉनच्या अलेक्झा स्पिकरला ‘फिजिकल चॅलेंज’ देण्यास सांगितले. त्यावर अलेक्झाने, ‘विजेच्या सॉकेटमध्ये अर्धा चार्जर घालून बटन सुरु करा व चार्जरच्या बाहेर असलेल्या अर्ध्या भागावर हाताने नाणे चिटकवा’ असे धोकादायक चॅलेंज दिले. मुलीची आई हे चॅलेंज ऐकताच, ‘नाही अलेक्झा नाही’ असं ओरडली.

कॉईन चॅलेंज म्हणून ओळखले जाणारे हे चॅलेंज टिकटॉक व अन्य काही सोशल मीडिया साईट्सवर गतवर्षी सुरु झाले होते. नाणी ही धातूपासून बनवलेली असल्यामुळे ती विद्युत वाहक असतात. त्यामुळे हे अत्यंत धोकादायक असून यातून आग लागणे, विजेचा धक्का बसने, हात गमवावा लागणे अशा दुर्घटना होऊ शकतात असं तज्ज्ञ सांगतात.

आपल्या मुलीसोबत झालेली ही घटना आई क्रिस्टिन लिव्हडाहल यांनी ट्विट करत सांगितली आहे.  लिव्हडाहल यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये, अलेक्झा स्मार्ट स्पिकरने हे चॅलेंज एका वेबसाईटच्या हवाल्याने दिले होते. तसेच ते पूर्ण करण्यासाठी २० मनीटांचा अवधी दिला होता.

दरम्यान, याबाबतची दखल घेतली असून अलेक्झामधील हा दोष दूर करण्यात आल्याच्या  अमेझॉनतर्फे सांगण्यात आले आहे.

अनेकदा आपण वेळ नसल्याने अथवा इतर काही कामात व्यस्त असल्याने मुलांच्या हातात स्मार्टफोन देतो अथवा इतर काही उपकरणे देतो. मात्र असे करत असताना हे आपल्या मुलांसाठी सुरक्षित आहे का? हे जाणून घेणे महत्वाचे आहे.       

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar