Saturday, August 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

होय डिप्रेशन बरे होऊ शकते! – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
September 26, 2021
in आरोग्य वार्ता
A A
होय डिप्रेशन बरे होऊ शकते! – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

36 वर्षांच्या सतीशला गेल्या काही दिवसांपासून कशातच रस वाटेनासा झाला होता. काही दिवस तो सतत कोणत्या तरी विचारात असल्यासारखा वागायचा. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे त्याचे फारसे लक्षही नसायचे किंबहुना त्याने लक्ष देण्याचा प्रयतक्‍ केला तरी डोक्‍यातील इतर विचारांमुळे त्याचे दुर्लक्ष होत असे.

याचबरोबर हल्लीच्या दिवसांत सतीशचे झोपेचे प्रमाणही अधिक वाढले होते. एरवी पेक्षा आता सतीश खूप उशिरा उठायला लागला होता आणि झोपेतून उठला तरी डोळ्यांवर झापड असायची. तो एका कंपनीमध्ये अकाऊंटंट म्हणून कामाला असल्याने त्याचे काम अतिशय जबाबदारीचे होते आणि त्यातून त्याला हल्ली वरचेवर ऑफिसला जायला उशीर होऊ लागला होता.

त्यामुळे बऱ्याचवेळा बॉसचे कटू शब्द ऐकायला लागत होते. या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्याच्या ऑफिसमधील परफॉर्मन्सवर होऊ लागला होता. सततच्या लेट मार्कमुळे पगारही कमी येऊ लागला होता. याच बरोबर भूक नसली तरी आपल्याला भूक लागलीये असं वाटून अति खाणेही सुरु झाले होते व त्यामुळे त्याचे वजनही खूप वाढले होते.

या वाढलेल्या वजनामुळे आपण आता बेढब दिसायला लागलो आहोत असे त्याला वाटत होते. हळू हळू त्याचे आई वडील, बायको, ऑफिस मधील सहकर्मचारी, मित्र मैत्रिणी यांनाही सतीशच्या वागणुकीमधला फरक जाणवायला लागला; हे सर्व बघून त्याच्या एका जवळच्या मित्राने त्याला मानसोपचार तज्ञांकडे जाण्याविषयी सुचविले.

हे ऐकून आपल्याला वेड तर नाही ना लागले असे विचार मनात यायला सुरुवात होऊन त्याचा आत्मविश्‍वास खूपच कमी झाला.तो सतत चिंतेमध्ये राहू लागला आणि आता त्याला अधून मधून प्रचंड घाम येऊन भीतीचे झटके येऊ लागले. त्याला वाटू लागले की मला हार्ट ऍटॅक येऊन मी मरून जाईन की काय? दिवसेंदिवस सतीशचा हा त्रास वाढतच गेला व आता त्याला जगण्यापेक्षा मरण सोपे वाटू लागले. सतत आत्महत्येचे विचार डोक्‍यात येऊ लागले.

हे सर्व बायकोच्या लक्षात आल्यामुळे अखेर ती त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन गेली; त्यावेळी त्यांना समजले की सतीशला डिप्रेशन या आजाराने ग्रासले आहे. सतीशने त्यानंतर नियमित ट्रीटमेंट सुरु घेतली व त्यामुळे आता सतीशचा आजार बराचसा आटोक्‍यात आला आहे. सतीशच्या या केसमध्ये त्याला कमी पगार, दररोजचे धकाधकीचे जीवन व यामुळे आपण आपल्या बायको मुलांवर अन्याय करतोय,

त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही अशी अपराधीपणाची भावना निर्माण झाली. त्याचबरोबर त्याच्या डिप्रेशनला खत पाणी घालून त्याची अपराधीपणाची भावना वाढविणाऱ्या व आत्मविश्‍वास कमी करणाऱ्या अनेक गोष्टी त्याच्या आयुष्यात घडत गेल्या; त्यामुळे त्याचा आजार अजूनच वृद्धिंन्गत झाला.

मित्रांनो डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे व तो योग्य त्या औषोधोपचारांनी नक्कीच बरा होऊ शकतो. जसा आपल्या शरीराला ताप येतो व आपले शरीर आजारी पडते अगदी तसेच आपले मनही कधीतरी आजारी पडू शकते. बहुतांशी वेळा आपण इतर लोकांना, त्यांच्याकडून झालेल्या चुकांना पट्‌कन माफ करून टाकतो पण स्वतःला माफ करायला विसरून जातो. अशा वेळी स्वतःला माफ करणे गरजेचे असते.

आजूबाजूची बिकट परिस्थिती ही आपल्याला अशक्त बनविण्यासाठी नाही तर सशक्त बनविण्यासाठी असते ही गोष्ट सतत लक्षात ठेवणे आवश्‍यक असते. आपल्या मेंदूमधील डोपामाईन व सेरेटोनीन या रसायनांच्या बदलामुळे मानसिक आजाराला सुरुवात होते परंतु औषधोपचारांमुळे हे बदल स्थिर होऊन आपला आजार नक्कीच आटोक्‍यात येतो म्हणूनच अशा वेळी शक्‍य तितके लवकर उपचार सुरु करणे फायद्याचे ठरते.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar