कुत्रा हा माणसाचा सर्वात चांगला मित्र मानला जातो. यासोबतच ते त्यांच्या मालकाशी खूप निष्ठावान असतात. कुत्रे खूप प्रामाणिक, निष्ठावान आणि हुशार असतात. परंतु जगात कुत्र्यांच्या काही प्रजाती अशाही आहेत ज्या अत्यंत भयानक आणि धोकादायक आहेत. धोक्याची सूचना मिळताच ते समोरच्यावर हल्ला करतात. त्यांच्या तावडीतून सुटणे अशक्य असते. तुमच्याकडेही असे कुत्रे असतील तर विशेष काळजी घ्या. आज आम्ही तुम्हाला कुत्र्यांच्या अशाच काही प्रजातींबद्दल सांगणार आहोत.
1. रॉटवेलर (Rottweiler)
जगातील सर्वात धोकादायक कुत्रा प्रजातींपैकी एक आहे. या कुत्र्याचे शरीर स्नायुयुक्त असून जबडे खूप शक्तिशाली असते. या जातीचे कुत्रे इतर कुत्रे आणि अनोळखी लोकांचा द्वेष करतात. रॉटवेलर्सना थोडासाही धोका जाणवल्यास ते कोणावरही हल्ला करतात. जर त्यांना समजले की त्यांचे मालक रागावले आहेत, तर ते त्यांच्यासाठीही अत्यंत धोकादायक असू शकतात.
2. पिटबुल (Pitbull)
पिटबुल हा जगातील सर्वात धोकादायक कुत्र्यांपैकी एक आहे. पिटबुल जातीचे कुत्रे त्यांच्या आक्रमक वृत्तीसाठी ओळखले जातात. ते खूपच आक्रमक असतात. या जातीच्या कुत्र्यांवर विश्वास ठेवणे जीवावर बेतू शकते. असे असले तरी पिटबुल त्यांच्या मालकांशी एकनिष्ठ, मैत्रीपूर्ण आणि विश्वासू असल्याचे मानले जाते.
३. जर्मन शेफर्ड (German Shepherd)
ही कुत्र्याची प्रजाती जर्मनीची आहे. असे मानले जाते की बहुतेक लोकांना जर्मन शेफर्ड आवडतात. या जातीचे कुत्रे त्यांच्या ताकद आणि निर्भयतेसाठी जगभरात ओळखले जातात. जर्मन शेफर्ड जितके धोकादायक आहेत तितकेच ते मैत्रीपूर्ण आहेत. थोडासा धोका जाणवल्यास ते कोणावरही हल्ला करतात. ते खूप चपळ आणि वेगवान देखील असतात.
4. चाऊ चाऊ (Chow-Chow)
चीनमध्ये आढळणारे चाऊ-चाऊ कुत्रे दिसायला खूप गोंडस आणि शांत असतात. पण या जातीचे कुत्रे अत्यंत धोकादायक देखील असतात. हा जगातील सर्वात धोकादायक कुत्र्यांपैकी एक आहे. त्यांच्या संमतीशिवाय कोणीही त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही, कारण ते स्वतःच्या मर्जीचे मालक असतात.
5.प्रेसा कॅनेरिओ (Presa Canario)
प्रेसा कॅनेरिओ देखील जगातील सर्वात धोकादायक कुत्र्यांपैकी एक आहे. आफ्रिकेत आढळणाऱ्या या प्रजातीच्या कुत्र्यांचे वजन माणसांच्या बरोबरीचे असते. ते 60 किलो पर्यंत असतात. ते अत्यंत धोकादायक मानले जातात. जर ते एखाद्यावर हल्ला करतात, तर त्यातून सुटणे फार कठीण असते.