Sunday, March 8, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

हे आहेत भारतातील ‘योग सप्तर्षी’ – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 21, 2021
in आरोग्य वार्ता
A A
हे आहेत भारतातील ‘योग सप्तर्षी’ – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे –  आज देश-विदेशातील लोक योग शिकण्यासाठी भारतात येतात. खरं तर हे त्याच योगगुरूंच्या परिश्रमांचे फळ आहे, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन योगाच्या नावाखाली समर्पित केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अशा काही महान योग ‘योग सप्तर्षी’ बाबत माहिती करुन घेऊया….

देशभरात आज सातवा योग दिवस साजरा केला जात आहे, 21 जून हा दिवस वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे आणि योग देखील एखाद्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य देखील प्रदान करतो. 21 सप्टेंबर 2015 रोजी प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला होता.

आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून स्वीकारण्याचा ठराव भारताचे राजदूत अशोक कुमार मुखर्जी यांनी मांडला होता. या ठरावाला 177 देशांचा एकमुखी पाठिंबा देऊन भारताचा व आपल्या ‘वसुधैव कुटुम्बकम’ संस्कृतीचा हा मोठाच गौरव केला, योग परंपरेला समृद्ध करण्यासाठी काही प्रख्यात योगगुरूंनी मोठे योगदान दिले आहे.

भारतातील सात ‘योग गुरु’

धीरेंद्र ब्रह्मचारी : धीरेंद्र ब्रह्मचारी हे इंदिरा गांधी यांचे योग शिक्षक म्हणून ओळख. दूरदर्शन वाहिनीच्या माध्यमातून योगाला प्रोत्साहन देण्याचे काम सुरू केले होते. तसेच, त्यांनी दिल्लीच्या शाळांमध्ये आणि योग आश्रमात योगा करण्यास प्रारंभ केला होता. हिंदी व इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके लिहून त्यांनी योगाला प्रोत्साहन दिले होते. जम्मूत त्यांचा एक आलिशान आश्रम आहे.

बीकेएस अयंगर – योगाला जगभरात मान्यता देण्यात बीकेएस अयंगर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘अयंगर योग’ यांच्या नावाने त्यांचे योग शाळा सुद्धा आहे. या शाळेच्या माध्यमातून त्यांनी जगभरातील लोकांना योगाबद्दल जागरूक केले होते.

2004 मध्ये टाईम मासिकाने त्यांना जगातील पहिल्या 100 प्रभावी लोकांपैकी एक म्हणून घोषित केले होते. याशिवाय, त्यांनी पतंजलीच्या योगसूत्रे नव्याने परिभाषित केली. योगा बायबल म्हणून ओळखले जाणारे ‘लाइट ऑन योग’ नावाचे पुस्तकही त्यांचे आहे.

कृष्णा पट्टाभी जोइस– कृष्णा पट्टाभी जोइस देखील एक उत्तम योग शिक्षक होते. त्यांचा जन्म 26 जुलै 1915 रोजी झाला होता, तर 18 मे 2009 रोजी त्यांचा मृत्यू झाला. कृष्णा यांनी अष्टांग विन्यास योग शैली विकसित केली. त्यांच्या अनुयायांमध्ये मडोना, स्टिंग आणि ग्विनेथ पॅल्ट्रो सारख्या मोठ्या नावांचा समावेश होता.

तिरुमलाई कृष्णामचार्य – तिरुमलाई कृष्णामचार्य यांना ‘आधुनिक योगाचे जनक’ म्हटले जाते. हठयोग आणि विन्यासला पुनरुज्जीवित करण्याचे सर्व श्रेय त्यांना जाते. तिरुमलाई कृष्णमचार्य यांना आयुर्वेदाचीही माहिती होती.

ते योग आणि आयुर्वेदाच्या मदतीने त्यांच्याकडे उपचारांसाठी आलेल्या लोकांना बरे करत होते. म्हैसूरच्या महाराजाच्या काळात त्यांनी योगाला भारतभर एक नवी ओळख दिली होती.

परमहंस योगानंद : परमहंस योगानंद आपल्या ‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ या पुस्तकासाठी ओळखले जातात. त्यांनी पाश्चिमात्य लोकांमध्ये मेडिटेशन आणि क्रिया योगाची ओळख करुन दिली. एवढेच नव्हे तर परमहंस योगानंद हे योगाचे पहिले आणि प्रमुख शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात बहुतेक वर्षे अमेरिकेत घालवली.

स्वामी शिवानंद सरस्वती : स्वामी शिवानंद सरस्वती हे पेशाने डॉक्टर होते. त्यांनी योग, वेदांत आणि इतर अनेक विषयांवर 200 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. ‘शिवानंद योग वेदांत’ या नावाने त्यांचे योग केंद्र आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या केंद्रासाठी समर्पित केले होते. त्यांनी योगासह कर्म आणि भक्ती एकत्र करून जगभर योगाचा प्रचार केला होता.

महर्षि महेश योगी : महर्षि महेश योगी हे देश आणि जगातील ‘ट्रांसैडेंटल मेडिटेशन’ चे एक प्रख्यात गुरु होते. बरेच सेलेब्रिटी त्यांना आपल्या गुरू मानतात. ते योगासाठी जगभर ओळखला जातात. श्री श्री रविशंकर हे महर्षि महेश योगी यांचे शिष्य आहेत.

आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 ची थीम
दरवर्षी योग दिन वेगवेगळ्या थीमच्या आधारे साजरा केला जातो. यावर्षी 2021 च्या योग दिनाची थीम ‘बी विथ योगा, बी अॅट होम’ म्हणजेच ‘योगासह रहा, घरी रहा’ अशी आहे. गेल्या वर्षी 2020 ची थीम ‘घरी राहून योगा करा’ अशी होती. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळं घरीच राहून योगा करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.


असा तयार झाला ‘योग’

योग हा शब्द ‘युज’ या संस्कृत धातू पासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. योग ही भारतातील पांच हजार वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे, ज्यात शरीर ताणले, वाकवले, पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो.

खरेतर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या विज्ञानाची ही म्हणजे योगाभ्यासाची केवळ वरवरची ओळख झाली. योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो.गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, “योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे.”

महर्षि पतंजलि हे योगशास्त्र या ग्रंथाचे कर्ते होत. त्यांच्या विचारांनुसार यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. त्यामुळे यास अष्टांगयोग असेही म्हटले जाते. योग आपल्यासाठी कधीही नवीन नव्हता.

आपण हे सर्व अगदी बालपणापासून करत आलो आहोत, मग ते पाठीचा कणा मजबूत करणारे मार्जारासन असो कि पचनशक्ती वाढवणारे पवनमुक्तासन असो. आपण शिशूंना दिवसभर काही न काही योग क्रिया करताना पाहतो. हरएक व्यक्तीला योगाचे वेगवेगळे महत्व आणि आवश्यकता आहे.
भारतात उगम पावलेली योग-विज्ञानाची सरिता आता विश्वाच्या कानाकोपऱ्यात सर्वदूर पसरली आहे. मुदलात तत्त्वज्ञानाचा व्यापक आणि सखोल मूलाधार असलेले हे शास्त्र काहींनी आध्यात्मिक वळणांनी पुढे नेले, तर अनेकांनी त्याच्या व्याधीमुक्ती तंत्राच्या अंगावर भर देऊन उपयोजित योगशास्त्र म्हणून ते आपापल्या पद्धतीने विकसित केले.

त्यामुळेच ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोग अशी सैद्धान्तिक मांडणी अंतर्निहित असलेली तत्त्वज्ञानाची बैठक समजून घेण्याच्या भानगडीत न पडता अनेकांनी हठयोगापासून ‘पॉवर-योगा’पर्यंत जे जे आपल्याला भावेल, रुचेल आणि पचेल ते उपयोजनेच्या पातळीवर पुढे नेले.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar