आजकाल पाणी (Water)पिण्यासंबंधी लोकांमध्ये बरेच समज-गैरसमज पाहायला मिळतात. सामान्य लोक अशास्रीय असे कुठले तरी वाचून वा ऐकीव माहितीच्या आधारे भरपूर मात्रेत पाणी (Water) पीत असतात. परंतु, हे लक्षात घ्यायला हवे की ज्या प्रमाणे अन्नाचे पचन होत असते त्याच प्रमाणे पाण्याचेही पचन होत असते. त्याचप्रमाणे ऋतू नुसार हि पाण्याचे (Water) पान करण्याचे प्रमाण हे बदलत असते.
लहान बाळाला जेव्हा भूक लागते, तेव्हा त्याला बोलता येत नसल्या कारणाने, ते भुकेची संवेदना रडण्याने व्यक्त करते. त्याचप्रमाणे शरिर हि भूक किंवा तहान लागल्यास त्याची संवेदना आपल्यास देते.
तेव्हाच खरेतर पाणी (Water) पिणे वा भोजन करणे योग्य असते .
“भोजना आदो जलं पीत अग्नी सादम् कृश अंगता।
अंते करोती स्थूलतवं ।।
मध्ये मध्य गतां जरनं ,
धातू गतां साम्यांमं ।। ”
जेवण्यापूर्वी पाण्याचे सेवन कसे असावे?
भोजनाआधी अधिक प्रमाणात जलपान केल्यास अग्नि मंद होतो आणि पचनशक्ती कमजोर होते.
काही लोक सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी 1-2 लीटर थंड किंवा गरम पाणी (Water) पितात. अशा लोकांमध्ये पचनाच्या अनेक समस्या आढळतात. त्यामुळे अशा रुग्णांनी सकाळी पाणी पिणे जरी बंद केले तरी त्यांचे पचनाचे आजार बिना औषध बरे होण्या सारखे असतात. पण यातील ज्या लोकांचे वजन जास्त प्रमाणात वाढलेले आहे, ज्यांना भूक जास्त लागते, अशा लोकांनी सकाळी जेवणाआधी थोड्याशा मात्रेत (1/2 ग्लास) पाणी पिण्यास हरकत नाही.
जेवणानंतर पाण्याचे सेवन कसे करावे? :-
– जेवणानंतर लगेचच भरपूर पाणी (Water) पिऊ नये.
– काहीजण जेवताना अजिबात पाणी (Water) पीत नाहीत, आणि जेवण झाल्यावर 1ते 2 श्रळीं पाणी पितात. अशांमध्ये पचन समस्या मुळे इतर विकार उद्भवतात जसे. अति प्रमाणात वजन वाढणे, आळस, शरीराला जडत्व वाटणे.
मग पाणी (Water) कधी प्यावे ?
आयुर्वेदानुसार पचन योग्यप्रकारे होण्यासाठी व शरीरातील धातू योग्य व सम प्रमाणात कार्यरत राहण्यासाठी जेवणाच्या मध्ये मध्ये घोट- घोट पाणी (Water) प्यावे. किंवा गोड ताक प्यावे, याने खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते.
व संपूर्ण जेवण झाल्यानंतर 1 तासाने योग्य प्रमाणात जेव्हढे आवश्यक तेव्हढेच पाणी (Water) घ्यावे.
शीत जल (Water) पान कधी करावे:-
ज्यांना पित्ताचे मुळे होणारे पाचनासंबंधीचे विकार म्हणजेच – अजीर्ण, आम्लपित्त आहे, मद्य पीडित ,पोटात दाह , गरमी, वारंवार तहान लागणे, अशा रुग्णांनी शीतल जलपान करावे.
उष्ण/कोमट जल पान कधी करावे :-
दीपनं पाचनं कंठयम् लघु उष्णम् बस्ति शोधनं ।
हिध्माध्मानानिल श्लेशमसु सद्य शुद्ध नवज्वरे।।
कास आम पिनस श्वास पार्श्वरुक्षु च शस्यते।।
गरम पाणी (Water) हे पचण्यास हलके व लघवी साफ कराणारे, भूक वाढवणारे असून उचकी, पोट फुगी , पोटात जडपणा, भरल्यासारखे वाटणे, रीशी, खाल्लेल्या अन्नाच्या ढेकरा येणे, पडसे अशी लक्षणे असताना अशा वेळी पिण्यासाठी कोष्ण (कोमट पाणी) जलाचा वापर पिण्यासाठी करावा.
– वैद्य गणेश पाचकवडे (आयुर्वेद तज्ज्ञ )