Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘हे’ आहेत जगातील पाच सर्वात विषारी कोळी, चावल्यास क्षणार्धात जीव जाऊ शकतो ! 

by
May 26, 2023
in लाईफस्टाईल
A A
‘हे’ आहेत जगातील पाच सर्वात विषारी कोळी, चावल्यास क्षणार्धात जीव जाऊ शकतो ! 
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. त्यापैकी काही अतिशय सुंदर आहेत, तर काही अतिशय धोकादायक आहेत. या प्राण्यांमध्ये आढळणारे विष कुणाचाही क्षणात जीव घेऊ शकते. आज आम्ही तुम्हाला जगातील पाच अत्यंत विषारी कोळ्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या चावण्याने एखाद्या व्यक्तीचा क्षणार्धात मृत्यू होऊ शकतो.

जगात कोळ्यांच्या 50 हजारांहून अधिक प्रजाती आढळतात. त्यांची माहिती शास्त्रज्ञांनी 265 वर्षांत मिळवली होती. एका अहवालानुसार, कोळी दरवर्षी सुमारे 40 ते 80 टन कीटक खातात. याद्वारे नैसर्गिक संतुलन निर्माण करण्याचे काम करतात. यातील अनेक कोळी किडे इतके धोकादायक आहेत की ते स्वतःहून अनेक पटींनी मोठ्या सापांना मारून खातात. 50 हजारांपैकी 43 हजार कोळ्यांच्या प्रजाती विषारी आहेत. चला, पाहुयात कोणते कोळी किडे सर्वाधिक विषारी आहेत.

1. सिडनी फनेल वेब स्पायडर | Venomous spiders

सर्वाधिक विषारी कोळी म्हणजे ‘सिडनी फनेल वेब स्पायडर’ ऑस्ट्रेलियात आढळतात. सिडनी फनेल वेब स्पायडर हा जगातील सर्वात विषारी आणि धोकादायक स्पायडर आहे. या कोळ्याचे वैज्ञानिक नाव अॅट्रॅक्स स्टॉक्सस आहे. शिकारीच्या दृष्टीने हा अतिशय धोकादायक स्पायडर आहे. त्याचे विष काही मिनिटांतच एखाद्या लहान मुलाचा जीव घेऊ शकते. त्याचा आकार फनेलसारखा आहे, त्यामुळे त्याला सिडनी फनेल म्हणतात. हे ओलसर भागात राहते.

2. ब्राझिलियन वॉन्डरिंग स्पायडर

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, ब्राझिलियन वॉन्डरिंग स्पायडर हा जगातील सर्वात विषारी स्पायडर आहे. यामध्ये आढळणारे न्यूरोटॉक्सिन विष इतके प्राणघातक आहे की त्याच्या चाव्याव्दारे कोणत्याही माणसाचा क्षणार्धात मृत्यू होऊ शकतो. हा कोळी कीडा चावल्यानंतर, व्यक्ती त्याच्या स्नायूंवर नियंत्रण गमावते आणि त्याला श्वासोच्छवासाच्या समस्या देखील सुरू होतात. या कोळ्याच्या चाव्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे.

3. ब्राऊन रिक्ल्युज स्पायडर

ब्राउन रिक्ल्युज स्पायडरचे नाव जगातील सर्वात विषारी स्पायडरमध्ये देखील येते. याला व्हायोलिन किंवा फिडल बॅक स्पायडर असेही म्हणतात. हा कोळी किडा मुख्यतः अमेरिकेच्या मध्य-पश्चिम आणि आग्नेय भागात आढळतो.

4. रेडबॅक विडो स्पायडर | Venomous spiders

ऑस्ट्रेलियामध्ये आढळणाऱ्या रेडबॅक विडो स्पायडरची पाठ लाल असते. यामुळे ते सहज ओळखता येतात. हे कोळी किडे शिकारीच्या दृष्टीने अत्यंत प्राणघातक असतात. त्यांच्या चाव्याच्या अनेक घटना समोर येत राहतात.

5. सिक्स आय सॅण्ड स्पायडर | Venomous spiders

जगातील विषारी कोळ्यांमध्ये या सिक्स आय सॅण्ड  स्पायडरचाही समावेश होतो. या कोळ्याचे वैज्ञानिक नाव सिकेरियस आहे, ज्याचा अर्थ ‘किलर’ आहे. त्यांच्या जवळ कोणी येताच हे कोळी किडे लगेच वाळूत लपतात. आणि मग ते त्यांना क्षणार्धात शिकार बनवतात. त्यांच्या चाव्यामुळे काही तासांतच एखादी व्यक्ती मरू शकते.

The post ‘हे’ आहेत जगातील पाच सर्वात विषारी कोळी, चावल्यास क्षणार्धात जीव जाऊ शकतो !  appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar