चरबी किंवा मेद याचे नाव घेतले तरी अनेकजण किंचाळायला लागतात. मेदापासून आपल्या कॅलरीज मिळतात. मेद शरीराला किती आवश्यक असतो आणि किती घातक असतो हे जाणून घेऊयात. त्याचबरोबर काही पदार्थातील कॅलरीजही… भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकाची सुरुवात बहुतेकदा तुपाच्या किंवा तेलाच्या फोडणीत वेगवेगळे मसाले घालून होते.
फोडणीमुळे मसाल्यांना स्वाद येतो. मसाल्यांचा वास येण्यास कारणीभूत होणारे घटक आणि इतर अन्नपदार्थ मेदात विरघळणारे असतात. म्हणजेच अन्नपदार्थांना सुवास आणि चव मेदामुळेच येते. एक ग्रॅम मेदापासून आपल्याला नऊ कॅलरीज मिळतात. तर एक ग्रॅम पिष्टमय पदार्थ व प्रथिनांपासून चार कॅलरीज मिळतात. म्हणजे हल्लीच्या आहार पद्धतीतील मुख्य दोष मेदाचाच आहे का? हे मेदच जाडी वाढविण्यास, हृदयविकार आणि कर्करोग होण्यास कारणीभूत ठरते आहे का?
मला वाटतं, खरी समस्या मेदयुक्त पदार्थही नसून हल्लीच्या आहारातील मेदाचे प्रकार ही आहे. हे समजण्यासाठी मेद किंवा चरबीबद्दल अधिक माहिती घेऊ या.
मेद दोन प्रकारात विभागले जातात.
1) थिजलेले मेद ः सॅच्युरेटेड फॅट्स (डऋअ)
या प्रकारची चरबी नेहमीच्या तापमानालासुद्धा थिजलेली असते. प्राण्यांपासून मिळालेली चरबी सहसा या प्रकारात मोडते. उदाहरणार्थ – दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ उदा. – दही, लोणी, तूप इत्यादी. नारळ आणि पाम तेल.
2) प्रवाही मेद ः अन्सॅच्युरेटेड फॅट्स (णऋअ)
या प्रकारची चरबी नेहमीच्या तापमानाला द्रवस्वरूपात असते, थिजलेली नसते. या मेदाचे मूळ वनस्पती असते. सर्व वनस्पतिजन्य तेले या प्रकारात मोडतात.
प्रवाही मेदाचेही दोन प्रकार आहेत.
अ) मोनो अन्सॅच्युरेटेड फॅट्स (चणऋअ)
यामध्ये चरबीच्या एकेकच साखळ्या असतात.
ब) पॉली अन्सॅच्युरेटेड फॅट्स (झणऋअ)
यामध्ये चरबीच्या अनेक साखळ्या असतात. या वेगवेगळ्या प्रकारच्या चरबीचे कार्य कसे चालते ते पुढील भागात पाहूया. म्हणजे आपल्याला हे चरबीचे प्रकार कशा प्रमाणात खायला पाहिजेत ते कळेल.
थिजलेले मेद (सॅच्युरेटेड फॅट्स (डऋअ)) प्रवाही मेद (अन्सॅच्युरेटेड फॅट्स (णऋअ)) याबद्दल आपण अधिक जाणून घेतले पाहिजे. पण, सगळेच एकदाच सांगितले तर माहितीचाच मेद साचायचा. त्यामुळे पुढील भागात अधिक माहिती घेऊयात.
कशात काय?
नाष्ट्याच्या विविध पदार्थांमध्ये किती कॅलरीज् असतात हे आपण मागील आठवड्यात पाहिले. आणखीही काही पदार्थ आहे जे आपण सकाळी नाष्ट्याला किंवा सायंकाळी खातो. या पदार्थांमधील कॅलरीज्ही जाणून घेऊया.