Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

हेपॅटायटीसवर मात करणारे ‘हे’ आहे स्वस्त आणि मस्त हेल्दी ड्रिंक – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
July 28, 2022
in आरोग्य वार्ता
A A
हेपॅटायटीसवर मात करणारे ‘हे’ आहे स्वस्त आणि मस्त हेल्दी ड्रिंक – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

भारतात वर्षानुवर्षे निरोगी खाण्याच्या सवयींवर भर दिला जात आहे. यामुळेच आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरले जाणारे मसाले आणि खाद्यपदार्थ शरीरासाठी खूप फायदेशीर मानले गेले आहेत. विशेषत: या हंगामात अशा देशी पेयांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जे केवळ चवीच्या दृष्टीनेच लोकांचे फेवरेट नसतात, तर आरोग्याच्या दृष्टीनेही ते खूप फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे.

लस्सी हे असेच एक पेय आहे, ज्याला आयुर्वेद आणि वैद्यकीय शास्त्र दोन्ही आरोग्यासाठी, विशेषतः यकृत निरोगी ठेवण्यासाठी अतिशय प्रभावी पेय मानतात. यकृत मजबूत ठेवल्याने तुम्ही अनेक प्रकारचे यकृताचे आजार टाळू शकता. त्यातही हेपॅटायटीस, लिव्हर सिरोसिस अशा आजारांमध्ये यकृत निरोगी ठेवण्यासाठी लस्सी फायदेशीर ठरते.

दही घुसळून करून तयार केलेले हे चवदार पेय अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे, ज्याचे नियमित सेवन केल्याने तुम्हाला डिहायड्रेशनच्या समस्येपासून वाचवता येते, पोट निरोगी राहते आणि इतर अनेक आजारांचा धोका कमी होतो. चला तर लस्सी पिण्याचे आरोग्य फायदे जाणून घेऊया.

* यकृतासाठी लस्सीचे फायदे
दही आणि लस्सी हे प्रोबायोटिक्सचे सर्वोत्तम नैसर्गिक स्रोत आहेत. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की त्याचे सेवन यकृतातील चरबीचे प्रमाण कमी करणे, यकृतातील जळजळ कमी करणे, सिरोसिसची लक्षणे कमी करणे आणि यकृताची कार्ये सुरळीत करणे यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यकृताच्या आरोग्यासाठी लस्सी खूप फायदेशीर आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे, त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनाही याचा फायदा होऊ शकतो.

* त्वचेचे फायदे
लस्सीमध्ये असलेले लॅक्टिक ऍसिड केवळ संसर्गाशी लढण्यातच मदत करत नाही, तर ते मुरुमांपासून बचाव करण्यासाठी, त्वचेला मॉइश्चराईझ करण्यासाठी आणि डाग कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. लॅक्टिक ऍसिड आणि व्हिटॅमिन डी यांचे मिश्रण तुमच्या त्वचेवरील वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. त्वचेसोबतच केसांना निरोगी ठेवण्यासाठी लस्सी देखील फायदेशीर आहे.

* हाडांची कमजोरी होते दूर
लस्सीमध्ये भरपूर कॅल्शियम असते, त्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी हे एक उत्तम पेय असू शकते. कॅल्शियमयुक्त गोष्टी हाडे आणि दात निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. कॅल्शियमयुक्त पदार्थांचे नियमित सेवन केल्यास वयोमानानुसार होणाऱ्या हाडांच्या समस्या टाळता येऊ शकतात.

* प्रतिकारशक्ती मजबूत होते
तुमच्या रोजच्या आहारात लस्सीचा समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप मदत होऊ शकते. हे लैक्टिक ऍसिड आणि व्हिटॅमिन डीचे समृद्ध स्त्रोत आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि शरीराला विविध रोगांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. शरीराच्या चांगल्या आरोग्यासोबत मजबूत प्रतिकारशक्तीसाठी लस्सी खाण्याची शिफारस तज्ञ करतात. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी लस्सीचे सेवन आरोग्यदायी ठरू शकते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar