Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

हृदय मजबूत करण्यासाठी गोमुखासन – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
July 27, 2021
in आरोग्य वार्ता
A A
हृदय मजबूत करण्यासाठी गोमुखासन – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

गोमुखासन हे एक बैठक स्थितीतील आसन आहे.

  • जमिनीवर सुखासनात प्रथम बसावे. नंतर डाव्या मांडीवर उजवी मांडी ठेवण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीने गायीच्या तोंडाच्या आकाराच्या दुमडलेल्या मांड्या एकावर एक ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  • डावा हात खालून वर व उजवा हात वरून खाली गुंफून पकडण्याचा प्रयत्न करावा. श्‍वसन संथ ठेवावे. अशा स्थितीत स्थिर राहावे.

गोमुखासन हे जसे डाव्या बाजूने करतात तसेच ते उजव्या बाजूनेही करतात. दोन्ही बाजूंनी केलेले गोमुखासन आपल्या हातापायांना चांगलाच व्यायाम देते. गुडघ्याचे सर्व आजार या आसनाने दूर होऊ शकतात. बगलेमध्ये जर गाठ आली असेल तर तीदेखील बरी होण्यास मदत होते. या आसनाने अतिरिक्त चरबी घटते. नाडी शुद्ध होते. गुडघे, पोटऱ्या, मांड्या, हातापायांचे स्नायू, दंड यामधील कार्य सुधारायला मदत होते.

या आसनामुळे स्त्री-पुरुषांचा लैंगिक सुखाचा आनंद द्विगुणित होतो. स्त्रियांचे गर्भाशयाचे विकार बरे होतात. पायांमध्ये ताकद येते. पोटऱ्यांचा मांसलपणा कमी होतो. आपल्या सीटवर वाढलेली चरबी कमी व्हायला मदत होते. स्त्रियांना कमनीय बांधा टिकवायचा असेल तर त्यांनी

रोज न चुकता गोमुखासन करावे.
स्थूल लोकांना आपल्या जाडीमुळे हे आसन करायला त्रास होतो. पाय गुडघ्यात दुमडून नितंबाला असा काही लावावा की ज्याने नाभीचे कार्य योग्यप्रकारे चालू राहाते व नाडी शुद्ध होते. आपल्या गुडघ्यांचा आकार पाय दुमडून गुडघे एकमेकांवर ठेवल्यामुळे अगदी गायीच्या तोंडासारखा होतो. ध्यान करताना मान सरळ ठेवावी.

या आसनात अनाहत चक्रावर दाब पडतो.
अंडकोष आणि शुक्राणूंची वाढ पुरुषांनी हे आसन नियमित केल्यास होते. वीर्यविकारांना दूर करणारे गोमुखासन हातापायांच्या स्नायूंबरोबरच शरीराची स्नायूसंस्था मजबूत बनवते. मन एकाग्र करायचे असेल तर गोमुखासन रोज करावे. या आसनात जास्तीत जास्त मनामध्ये सावकाश 20 अंक मोजून स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा.

“स्थिरम्‌ सुखम्‌ आसनम्‌’ या योगातील उक्तीचा प्रत्यय हे आसन नियमित करणाऱ्यांना येतो. कालावधी हळूहळू वाढवावा. मूळव्याध व मधुमेह असणाऱ्यांनी हे आसन रोज करावे.
ज्यांचे पोटाचे ऑपरेशन झालेले आहे अथवा पाठीची शस्त्रक्रिया झाली आहे किंवा कृत्रिम हाडरोपण हातापायांमध्ये करण्यात आलेले आहे, अशांनी गोमुखासन करू नये.

प्रवास करून शिणलेल्या हातापायांना एक प्रकारची शक्ती व स्फूर्ती प्रदान करण्यासाठी प्रवासाहून परतल्यावर हे गोमुखासन करावे. मधुमेहाप्रमाणेच अंगावरील कोड जाण्यासही गोमुखासन मदत करते. यावर संशोधन चालू आहे. तसेच रक्तपिती किंवा महारोगावरही गोमुखासनाचा उपाय उत्तम आहे.

अशाच पद्धतीने दंडस्थितीतही गोमुखासन करता येते. फक्‍त उभे राहून आपण एकदा डावा व एकदा उजवा हात वर घेऊन एकमेकात गुंफून हे आसन करतात. उभे राहताना दोन पायात थोडे अंतर घ्यावे. काही वेळा पाऊले जुळवून उभे राहिले तर तोल जाण्याची शक्‍यता असते म्हणून अंतर घ्यावे. हे आसन नियमित केल्याने हृदय बलवान होते.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar