Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

हृदय मजबूत करणारे हृदयस्तंभासन – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
September 26, 2021
in आरोग्य वार्ता
A A
हृदय मजबूत करणारे हृदयस्तंभासन – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

हृदयस्तंभासन हे शयनस्थितील आसन आहे. या आसनाचा संबंध सरळ हृदयाशी येतो त्यामुळे त्याला हृदयस्तंभासन म्हणतात. हे आसन करण्याची पद्धत खालीलप्रमाणे.

प्रथम मऊ चादरीवर शयनस्थिती घ्यावी, मग दोन्ही हात लांब करून हात आणि डोके उचलावे, त्याचप्रमाणे दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन दोन्ही पायही उचलावे. जमिनीपासून एक फुटापर्यंत डोके, हातपाय उचलण्याचा प्रयत्न करावा. आसनस्थितीत संथ श्‍वसन करावे.

काही तज्ज्ञांच्या मते या आसनाची स्थिती घेताना कुंभक करून हात-पाय, डोके उचलावे, पण त्यामुळे नवीन करणाऱ्याला एकदम घाबरल्यासारखे होते. म्हणून आसनस्थितीत श्‍वसन संथ चालू ठेवावे. आसनावस्थेमध्ये दृष्टी हृदयस्थानावर एकाग्र करावी आणि तिथले स्नायू ढिले सोडावे. जेवढा वेळ टिकवता येईल तेवढा वेळ टिकवावे, कालावधी पंधरा सेंकद आहे परंतु सरावाने तो वाढवता येतो. या आसनाची स्थिती सोडताना श्‍वास घेत घेत हळूहळू हात-पाय, डोके पूर्वस्थितीत न्यावेत. या आसनाचे अनेक फायदे आहेत.

हृदय मजबूत होते, छाती, मान, पाठ, इत्यादी विकारांवर हे आसन लाभदायक आहे. हे आसन नियमित करणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येत नाही. मेद घटतो, अवाजवी चरबी वाढत नाही.

स्त्रियांनी हे आसन मासिकपाळीत तसेच गर्भावस्थेत करू नये. आपले हृदय मजबूत रहावे असे प्रत्येकालाच वाटत असते. परंतु नुसते वाटून उपयोग नाही तर त्यासाठी रोज हृदयस्तंभासन नियमित केले पाहिजे.
उच्च रक्‍तदाब, तसेच दमा असलेल्यांनी हे आसन डॉक्‍टरांना विचारल्याशिवाय करू नये. मधुमेहींनी हे आसन जरूर करावे कारण हातापायांना चांगला ताण येतो व शर्करा नियंत्रणास मदत होते. मुख्यत्वे हृदयविकार टाळण्यासाठी प्रथमपासूनच हृदयस्तंभासन करणे आवश्‍यक आहे.

हृदयाचे आरोग्य योग्य राखण्यासाठी कोणतेही आसन तुम्ही करत असाल, तरी त्यावेळी आपला श्‍वास नियंत्रित करणे अत्यावश्‍यक ठरते. अन्यथा अनावश्‍यक ताण निर्माण होतो, ज्याने वेदना वाढू शकते. त्यामुळे हृदयरोग्यांनी आसने करताना अनुभवी योगशिक्षकाची मदत घेणे हे कायमसाठी महत्त्वाचे राहील, असे सुचवावेसे वाटते.

हृदय मजबूत करणारे हृदयस्तंभासन

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar