प्रत्यारोपण केलेला अवयव शरीराने नाकारू नये यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे आरोग्यविषयी गुंतागुंत किंवा मूत्रपिंडावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते.
दात्याने दिलेले हृदय शरीराकडून नाकारले जाण्याची काही प्रमाणात शक्यता असते. ही एक मोठी जोखीम असते.सुमारे दहा टक्के रुग्णांमध्ये प्रत्यारोपणानंतर हृदय शरीराकडून नाकारले जाण्याची लक्षणे दिसतात.
हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतरच्या पहिल्याच वर्षात ही लक्षणे दिसतात.
हृदयाशी संबंधित पेशींची बायोप्सी करून त्यावरून हृदय शरीराने स्वीकारले आहे किंवा कसे याबाबतच्या लक्षणांची माहिती घेतली जाते.
प्रत्यारोपण केलेला अवयव शरीराने नाकारू नये यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे विषाणूंचा प्रतिकार करण्याची शक्ती कमी होते.