Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

हृदयविकाराबाबत जनजागृती प्रशिक्षणामुळे जीव वाचविण्यास मदत होईल

by प्रभात वृत्तसेवा
September 25, 2021
in लाईफस्टाईल
A A
हृदयविकाराबाबत जनजागृती प्रशिक्षणामुळे जीव वाचविण्यास मदत होईल
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आलेला देखील काही वेळा समजत नाही. हृदयविकार नेमका कसा ओळखायचा इथपासून ते हृदयविकाराचे प्रकार आणि तातडीचे प्राथमिक उपचार याची माहिती असणे गरजेचे आहे.

आणि अशा माहितीसह प्रशिक्षणाचा कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने “आय केअर’ संस्थेच्या सहकार्याने अधिकारी-कर्मचारी तसेच राज्यातील सर्व माध्यमकर्मींसाठी आयोजित केला तो अत्यंत स्तुत्य व अभिनंदनीय आहे, असे गौरवोद्गार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी काढले.

आय केअर संस्था आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहाच्या दूरदृश्‍यपणालीद्वारे प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

अल्प व मध्यमवयीन नागरिक सुद्धा या अकस्मात हृदयरोगाला बळी पडत आहेत. हृदयाचा झटका आणि कार्डियाक अरेस्टची घटना आपल्या आजूबाजूला घडत असते तेव्हा अशा प्रकारचे कार्डिओ पल्मोनरी रिसिटेशन (सीपीआर)ची माहिती व प्रशिक्षण असेल तर काही मिनिटाच्या सुवर्णकाळात आपण त्या रुग्णाचे प्राण वाचवू शकतो यासाठी प्राथमिक उपचाराची माहिती असणे आवश्‍यक आहे. हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्ट जनजागृतीमुळे नागरिकांचा जीव वाचविण्यास मदत होईल असेही तटकरे यांनी सांगितले.

हृदयविकाराचा झटका व कार्डियाक अरेस्ट यातील फरक कसा ओळखणे आणि तीन मिनिटांमध्ये रुग्णाचा उपचार सुरु करणे आवश्‍यक आहे. याचे चार टप्प्यांमध्ये सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण दिले. हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियाक अरेस्ट या संदर्भातील सीपीआर (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) प्रशिक्षणाची उपयुक्तता संदर्भात क्रिकेटर सुनील गावस्कर, सिनेअभिनेता आमीर खान, कार्तिक आर्यन, अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांचा जनजागृतीपर संदेश प्रसारित करण्यात आला.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar