Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

हृदयरोग उपचार आता अधिक सुरक्षित – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
March 16, 2022
in आरोग्य वार्ता
A A
हृदयरोग उपचार आता अधिक सुरक्षित – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – मानवी अवयवांत मेंदू आणि हृदयाला अधिक महत्त्व आहे. त्याच्या उपचारांतील सुरक्षितता आणि अचूकता वाढवण्यासाठी “हायब्रिड कॅथलॅब’ ही आता आधुनिक वैद्यकशास्त्राने दिलेली नवीन देणगी आहे. पुण्यातील अशा प्रकारची अद्ययावत हायब्रिड कॅथलॅब रुबी हॉल क्‍लिनिकमध्ये सुरू झाली आहे.

अशी असते हायब्रिड कॅथलॅब
कॅथलॅब ही हृदयरोगावर उपचार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. हृदयरोग तज्ज्ञ कॅथलॅबमध्ये रुग्णांवर अँजिओग्राफी आणि अँजिओप्लॅस्टी करतात. येथे रुग्णावर कोणतीही शस्त्रक्रिया होत नाही. काही वेळा रुग्णाला अँजिओप्लॅस्टी करताना गुंतागुंत झाल्यास रुग्णाला तातडीने शस्त्रक्रिया कक्षात न्यावे लागते. हायब्रिड कॅथलॅबमध्ये रुग्णाला शस्त्रक्रिया कक्षेत नेण्याची गरज नसते. कॅथलॅबचे रुपांतर शस्त्रक्रिया कक्षेत करण्याची सुविधा उपलब्ध असते. त्यामुळे उपचारांतील अत्यंत महत्त्वाचा वेळ वाचतो आणि तातडीचे उपचार शक्‍य होतात.

हायब्रिड कॅथलॅबमधील डिजिटली दिसणाऱ्या हृदयातील रक्तवाहिन्यांच्या चित्राची गुणवत्ता अप्रतिम आहे. तसेच, अँजिओप्लॅस्टी करताना गुंतागुंत झाल्यास त्याच ठिकाणी शस्त्रक्रिया करण्याची सुविधा येथे आहे. त्यामुळे हृदयरोगाच्या आव्हानात्मक रुग्णांवर सुरक्षित उपचार करण्यासाठी हा योग्य पर्याय आहे.
– डॉ. परवेझ ग्रॅंट, व्यवस्थापकीय संचालक, रुबी हॉल क्‍लिनिक

आपत्कालिन स्थितीत कशी उपयुक्त ठरते कॅथलॅब?
*हृदय शल्यचिकीत्सक, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, व्हॅस्कुलर सर्जन, इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट आणि न्यूरो-इंटरव्हेंशनलिस्ट हे सर्व तज्ज्ञ डॉक्‍टर रुग्णासेवेसाठी एकाच ठिकाणी येऊ शकतात.
*पारंपरिक कॅथलॅबमध्ये आपत्कालिन परिस्थिती रुग्णाची हृदय शस्त्रक्रियेसाठी छाती उघडण्याची सुविधा नाही. हायब्रिड कॅथलॅबमध्ये ही शस्त्रक्रिया करता येते.
*रुग्णाचे प्राण वाचवणारी सर्व यंत्रणा येथे सक्रीय असते.
*रक्तवाहिन्यांशी संबंधित सविस्तर माहिती तज्ज्ञांना अत्यंत स्पष्ट आणि मोठ्या स्वरुपात डिजिटल स्वरूपात पाहता येते. त्यामुळे हृदयरोगाचे अचून निदान करणे शक्‍य असते
*उपचारासाठी जास्त वेळ रुग्णालयात थांबावे लागणार नाही

रुग्णांना होईल असा फायदा
*जुन्या पद्धतीच्या कॅथलॅबच्या तुलनेत रुग्णांना होणाऱ्या रेडिएशनचे प्रमाण कमी
*हृदय उपचारातील सुरक्षितता वाढते
*गुंतागुतीच्या रुग्णांवर प्रभावी उपचाराचा पर्याय

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar