Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

ही 5 लक्षणे महिलांमध्ये चांगली प्रजनन क्षमता दर्शवतात, जाणून घ्या तुमची प्रेग्नेंसी अवघड होणार की सोपी?

by
June 24, 2023
in आरोग्य वार्ता
A A
ही 5 लक्षणे महिलांमध्ये चांगली प्रजनन क्षमता दर्शवतात, जाणून घ्या तुमची प्रेग्नेंसी अवघड होणार की सोपी?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे –  मातृत्व हा जगातील प्रत्येक स्त्रीसाठी एक सुंदर आणि आनंददायी अनुभव आहे. मात्र यासोबत अनेक आव्हाने आणि कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते. आजची खराब जीवनशैली आणि अयोग्य खाण्याच्या सवयींचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक महिलांना गरोदरपणात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही स्त्रिया अगदी सहज गरोदर होतात. दरम्यान अशाच काही लक्षणांबद्दल सांगत आहोत, ज्यावरून तुम्ही समजू शकता की तुमची प्रजनन क्षमता ( female fertility ) किती चांगली आहे. ( What are the top 5 causes of female fertility )

तुमचे वय 20 ते 25 च्या दरम्यान असावे
आतापर्यंत जगभरात केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की 20 ते 24 वयोगटातील कोणत्याही महिलेची प्रजनन क्षमता ( female fertility ) सर्वोत्तम असते. खरं तर, प्रजनन वय सर्व स्त्रियांसाठी समान नसते आणि ते बदलू शकतात. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की वयानुसार प्रजनन क्षमता हळूहळू कमी होत जाते. अशात अनेक रुग्णांच्या आयुष्यात मातृत्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक गंभीर प्रश्नांना पुढे जावं लागते.

 

 

मासिक पाळी नियमित होईल
सर्व स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळीत वेळोवेळी अनियमितता येणे सामान्य आहे. पण त्यात जर खूप अनियमितता असेल तर ती टेन्शनची बाब आहे. जर तुमची मासिक पाळी नियमितपणे दर महिन्याला येत असेल तर ते उत्तम प्रजननक्षमतेचे लक्षण आहे. 

गुणसूत्र
जेव्हा गरोदरपणाचा विचार केला जातो, तेव्हा तुम्ही इतर महिलांकडून त्यांना किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींना गर्भधारणेदरम्यान कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते याबद्दल ऐकले असेल. परंतु कौटुंबिक इतिहासाच्या आधारे स्त्रीच्या प्रजनन क्षमतेचा अंदाज बांधणे फार कठीण आहे.

योनीतून स्त्राव
मासिक पाळीच्या वेळी योनीतून स्वच्छ, गंधहीन स्त्राव होत असेल तर ते चांगले लक्षण आहे. याचा अर्थ असा की गर्भाशय (ग्रीवा) शुक्राणूंना सहज हलवण्यास आणि रोपण करण्यास मदत करते. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.

पीएमएस (प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम)ची लक्षणे
मासिक पाळीच्या आधीच्या सिंड्रोमच्या लक्षणांमध्ये मूड बदलणे, अन्नाची वारंवार लालसा, ओटीपोटात दुखणे, थकवा, चिडचिड आणि नैराश्य यांचा समावेश होतो. 4 पैकी 3 महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान वरीलपैकी काही लक्षणांचा त्रास होतो. जरी तुम्हाला ही लक्षणे आवडत नसली तरी हे प्रजननक्षमतेचे लक्षण आहे. या लक्षणांचा अर्थ असा आहे की तुमचे शरीर जसे पाहिजे तसे काम करत आहे. तथापि, तीव्र वेदना असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

The post ही 5 लक्षणे महिलांमध्ये चांगली प्रजनन क्षमता दर्शवतात, जाणून घ्या तुमची प्रेग्नेंसी अवघड होणार की सोपी? appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar