डिजिटल जगात 4G कनेक्टिव्हिटी आल्यापासून ऑनलाइन स्ट्रीमिंग आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्मची भरभराट झाली आहे. यानंतर यूट्यूबवर अनेक कन्टेन्ट क्रिएटर (निर्माते) आणि कलाकारांनी देशभरात आपला ठसा उमटवला. आता अनेक लोक पूर्णवेळ रोजगार म्हणून यु ट्यूब (YouTube) वापरत आहेत. यु ट्यूबने जगभरातील लोकांना त्यांची सर्जनशीलता दाखवण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे आणि त्यांना लोकप्रिय देखील केले आहे. इतकंच नाही तर क्रिएटर्सना युट्युबमधून चांगले उत्पन्नही मिळत आहे.
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार, भारतीय यु ट्युबर्सने 2020 मध्ये भारताच्या GDP मध्ये 6,800 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. त्यामुळे, जर तुम्हीही यूट्यूबवर तुमचे चॅनल बनवण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्याकडे आधीच चॅनल असेल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो. या अहवालात, आम्ही तुम्हाला यु ट्यूब चॅनेलवर एंगेजमेंट वाढवण्याचे मार्ग आणि साधने सांगू, जेणेकरून तुम्ही लवकरच अधिक वापरकर्त्यांपर्यंत तुमची पोहोच वाढवू शकाल. चला, जाणून घेऊया….
योग्य कन्टेन्ट निवडणे
तुम्हाला तुमच्या यु ट्यूब चॅनेलवर सदस्य आणि एंगेजमेंट वाढवायची असेल, तर तुम्ही त्यासाठी नेहमी योग्य सामग्री वा कन्टेन्ट निवडावे. तुम्ही व्हिडिओसाठी एक विषय निवडा, जो ट्रेंडमध्ये आहे, जो लोकांना ऐकायला आणि बघायला आवडतो. जर विषय लोकांच्या समस्यांशी संबंधित असेल किंवा लोकांचे मनोरंजन करू शकत असेल, तर वापरकर्त्यांना अशा प्रकारचा मजकूर अधिक पहायला आवडतो.
ब्यूअर्सशी संवाद साधा
तुम्ही कंटेंटची निवड आणि फीडबॅकसाठी वापरकर्त्यांशी देखील बोलू शकता. यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे कमेंट बॉक्स. तुम्ही तुमच्या व्हिडिओंवर तुमच्या ब्यूअर्सची मतं आणि फीडबॅक घेत राहणे आवश्यक आहे. हे तुम्हाला आगामी व्हिडिओ तयार करण्यात आणि कन्टेन्ट निवडण्यात तसेच ब्यूअर्सच्या पसंतीनुसार तुमचा कन्टेन्ट सुधारण्यात मदत करेल. तुम्ही ब्यूअर्सच्या टिप्पण्यांना देखील प्रतिसाद दिले पाहिजे, यामुळे ब्यूअर्स आणि तुमच्यातील संबंध मजबूत होतील.
यु ट्यूब शॉर्ट्स वापरा
सध्या छोटे-छोटे व्हिडिओ खूप पसंत केले जात आहेत. आपण यु ट्यूब शॉर्ट्ससह देखील सुरुवात करू शकता. शॉर्ट्स व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या करोडोंमध्ये आहे आणि तो बनवायलाही कमी वेळ लागतो. तुम्ही यु ट्यूब शॉर्ट्सच्या मदतीने नवीन ब्यूअर्सपर्यंत पोहोचू शकता. यु ट्यूब शॉर्ट्ससाठी यु ट्यूबवर अनेक क्रिएटर टूल्स देखील उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही व्हिडिओ सहजपणे एडिट करू शकता.
यु ट्यूब लाइव्ह
तुम्हाला वेळोवेळी लोकांशी थेट संपर्क साधण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांच्या टिप्पण्या घेण्याचा आणि त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्नही करावा लागेल. असे केल्याने, लोक तुमच्याशी थेट कनेक्ट होऊ शकतील आणि ही युक्ती तुम्हाला यु ट्यूबवर सदस्य वाढविण्यात देखील मदत करेल.
इतर यु ट्युबरसह कोलॅबरेट करा
इतर यु ट्युबरसह कोलॅबरेट केल्यास दोघांनाही फायदाहोईल. यामुळे दोन्ही कन्टेन्ट क्रिएटर्सचे सदस्य वेगाने वाढतात. यासाठी तुम्हाला एक चांगला विषय निवडावा लागेल आणि अनोख्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतर यु ट्युबर्ससह कोलॅब करावे लागेल, जेणेकरून ब्यूअर्सना तुमचा व्हिडिओ आकर्षक वाटेल आणि ते तुमच्याशी कनेक्ट होऊ शकतील.
गुणवत्ता आणि प्रभावांचा वापर
व्हिडिओचा दर्जा आणि त्याचे एडिटिंग खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही यु ट्यूब व्हिडिओसाठी चांगली थीम निवडल्यानंतर, तुम्हाला आता तुमच्या व्हिडिओची गुणवत्ता आणि प्रभाव यावरही लक्ष केंद्रित करावे लागेल. चांगल्या कॅमेरा क्वालिटीचा मोबाईल किंवा कॅमेरा वापरून व्हिडीओ शूट करा, जेणेकरून तुम्हाला चांगली व्हिडीओ क्वालिटी मिळेल. त्याच वेळी, व्हिडिओ एडिट करताना चांगले इफेक्टस वापरण्याची खात्री करा.