Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी भाजी, किंमत जाणून डोके धरून बसाल !

by
November 30, 2022
in आहार
A A
‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी भाजी, किंमत जाणून डोके धरून बसाल !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

जगात अनेक प्रकारच्या भाज्या आढळतात, ज्यांची किंमत वेगवेगळी असते. पण जगात अशीही एक भाजी आहे, ज्याची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल, कारण या भाजीच्या किमतीत तुम्ही सोन्याचा हार खरेदी करू शकता. हे जाणून घेतल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे पूर्णपणे सत्य आहे. चला जाणून घेऊया या भाजीचे नाव काय आहे आणि त्याची किंमत काय आहे?

जगातील सर्वात महागड्या भाजीचे नाव हॉप शूट्स आहे जी सामान्य भाजी नाही. भाजी मंडईत किंवा इतर मंडईत इतर भाज्यांप्रमाणे क्वचितच मिळतात. ही भाजी तुम्ही ऑर्डर करून मागवू शकता. बाजारात हॉप शूट भाजीची किंमत 80 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. एक किलो हॉप शूटच्या किमतीत सामान्य माणूस सोन्याचा हार खरेदी करू शकतो. उत्तर अमेरिकेत आढळणारे हॉप शूट हिरवे असतात आणि त्यांना शंकूच्या आकाराची फुले असतात. ही भाजी बिअर बनवण्यासाठी वापरली जाते.

हॉप शूट्स एक फूल बनवतात ज्याला आपण हॉप कोन म्हणतो. त्याची फुलं बिअर बनवण्यासाठी वापरली जातात तर त्याच्या डहाळ्यांचा वापर खाण्यासाठी होतो. महागडी भाजी असल्याने ती खाणे सर्वसामान्यांना शक्यच होत नाही. ही भाजी क्षयरोगाच्या उपचारातही वापरली जाते. त्याची देठ क्षयरोगाच्या उपचारात खूप प्रभावी मानली जाते. हॉप शूट्सचा वापर औषधे बनवण्यासाठी देखील केला जातो. हॉप्सला सातत्यपूर्ण तापमान आणि वर्गीकरण आवश्यक असते.

अनेक वर्षांपासून हा भाजीपाला याच भावात बाजारात विकला जात आहे. जगातील सर्वात महागड्या भाज्यांची किंमत वेगवेगळी असते. कारण त्याची किंमत त्याच्या गुणवत्तेवर ठरवली जाते. अत्यंत दुर्मिळ असलेली हॉप शूट भाजी वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या स्वरूपात वापरल्या जातात.

या भाजीत अनेक चमत्करिक घटक पाहायला मिळतात. त्याच्या वापराने अनेक रोग बरे होतात. हॉप्समध्ये अनेक प्रतिजैविक घटक आढळतात. यामुळे याचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून केला जातो. या भाजीचा उपयोग कॅन्सर आणि टीबी सारख्या गंभीर आजारांवर औषधे बनवण्यासाठी केला जातो.

हॉप शूट्स कच्चे देखील खाल्ले जातात, मात्र ते खूप कडू असतात. याच्या फांद्या सलाड म्हणूनही वापरता येतात. याचे फूलही खूप कडू असते. ते लोणचे बनवूनही वापरता येते. याचे लोणचे मात्र खूप चविष्ट असते.

The post ‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी भाजी, किंमत जाणून डोके धरून बसाल ! appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar