Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘ही’ आहेत जगातील सर्वाधिक झपाटलेली ठिकाणे ! कणखर मनाचे लोकही जाणे टाळतात

by
November 2, 2022
in लाईफस्टाईल
A A
‘ही’ आहेत जगातील सर्वाधिक झपाटलेली ठिकाणे ! कणखर मनाचे लोकही जाणे टाळतात
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आजच्या काळात लोक भुताच्या कथांवर कमी विश्वास ठेवतात. मात्र जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी खूप भीतीदायक आहेत. चला तर, आम्ही तुम्हाला जगातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांबद्दल सांगतो, ज्याबद्दल जाणून घेऊन तुम्ही थक्क व्हाल !

1. पोवेग्लिया बेट
इटलीतील व्हेनिस शहर हे जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथे असलेले पोवेग्लिया बेट जितके सुंदर आहे तितकेच ते झपाटलेले आहे. हे झपाटलेले बेट व्हेनिस आणि लिडोच्या दरम्यान आहे. असे म्हटले जाते की 20 व्या शतकात, बुबोनिक प्लेगने पीडित लोकांना या ठिकाणी अलग ठेवण्यात आले होते. त्यानंतर 1920 मध्ये मानसिक रुग्णांचा आश्रय म्हणून त्याचा वापर करण्यात आला. नंतर हे ठिकाण झपाटलेले असल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र सध्या तांत्रिक अडचणींमुळे हे बेट लोकांसाठी बंद आहे.

2. अल्काट्राझ बेट
जगातील सुंदर शहरांमध्ये सॅन फ्रान्सिस्कोचाही समावेश होतो. हे शहर रंगीबेरंगी व्हिक्टोरियन घरे, आकर्षक केबल कार आणि आयकॉनिक गोल्डन गेट ब्रिजसाठी जगप्रसिद्ध आहे. धोकादायक गुन्हेगारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या सुंदर शहरात अल्काट्राझ बेट आहे. या बेटाला कैदी जेल असेही म्हणतात. तुम्ही मनाने खंबीर असाल तरच तुम्ही या बेटावर अंधारात फिरू शकता.

3. डॉल्स आयलँड
मेक्सिको सिटी हे जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. हे शहर जितके सुंदर आहे तितकेच इथले ‘इस्ला दे लास मुनेकास’ किंवा ‘डॉल्स आयलँड’ म्हणजेच बाहुल्यांचे हे बेट भीतिदायक आहे. असं म्हटलं जातं की इथे अचानक भितीदायक बाहुल्या झाडांवर लटकताना दिसतात. या बेटावर एक मुलगी गूढ परिस्थितीत बुडाली, जिचा आत्मा बाहुलीमध्ये राहतो, असे म्हटले जाते. स्थानिक लोक सांगतात की बाहुली आपले डोके आणि हात हलवते. या भितीदायक ठिकाणी एकट्याने जाण्याचे धाडस कोणी करत नाही.

4. आयल ऑफ विट
इंग्लंडच्या दक्षिण किनार्‍यावर वसलेले आयल ऑफ विट हे अतिशय भितीदायक ठिकाण आहे. असे म्हणतात की हे ऐतिहासिक ठिकाण भडक कथांसाठी ओळखले जाते. असे म्हणतात की इतर ठिकाणची भुते दरवर्षी येथे जमतात. जर तुम्हाला भुतांना भेटायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.

5. टॉवर ऑफ लंडन
इंग्लंडमधील टॉवर ऑफ लंडन अर्थात लंडनचा टॉवर हे जगातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. असे म्हटले जाते की या टॉवरमध्ये अनेक राजकुमार आणि इतर लोक मारले गेले. या लोकांचे आत्मे आजही या ठिकाणी फिरतात.

The post ‘ही’ आहेत जगातील सर्वाधिक झपाटलेली ठिकाणे ! कणखर मनाचे लोकही जाणे टाळतात appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar