Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

हिवाळ्यात दररोज संत्री खा आणि निरोगी राहा; वाचा ४ ‘महत्वपूर्ण’ फायदे…

by प्रभात वृत्तसेवा
November 11, 2021
in आरोग्य वार्ता
A A
हिवाळ्यात दररोज संत्री खा आणि निरोगी राहा; वाचा ४ ‘महत्वपूर्ण’ फायदे…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

संत्रा जगातील बहुतांश लोकांच्या आवडत्या फळांपैकी एक आहे. हिवाळ्यात संत्री मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज संत्र्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.  संत्र्यामध्ये आढळणारे जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांमुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो.  संत्र्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन-सी, थायमिन, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक मानले जातात.

एका अभ्यासानुसार, करोनामुळे या काळात व्हिटॅमिन-सी युक्त गोष्टींच्या सेवनावर अधिक भर दिला जात आहे. संत्री व्हिटॅमिन सी चा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे, जो व्हिटॅमिन सी च्या दैनंदिन गरजा 100 टक्के पूर्ण करू शकतो. संत्र्यासारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये देखील सायट्रिक ऍसिड आणि सायट्रेट भरपूर प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी इतर अनेक प्रकारे फायदेशीर ठरते तसेच किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते.  चला तर, जाणून घेऊया संत्र्याचे विविध फायदे.

० हृदयरोगात फायदेशीर

हृदयविकार सध्या जगभरातील अकाली मृत्यूच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. अभ्यासात असे दिसून आले आहे की संत्र्याच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो.  संत्र्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचा घटक आढळतो ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. मानवावरील क्लिनिकल अभ्यासानुसार चार आठवडे दररोज संत्र्याचे सेवन केल्यास रक्तदाब कमी होण्यास तसेच रक्त पातळ होण्यास मदत झाल्याचे सिद्ध झाले आहे.

० किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते

संत्री सायट्रिक ऍसिड आणि सायट्रेटचा एक चांगला स्रोत आहे, जे तज्ज्ञांच्या मते किडनी स्टोन तयार होण्यापासून रोखण्यास मदत करतात. अशा रुग्णांमध्ये, पोटॅशियम सायट्रेटचे सेवन करण्याची शिफारस केली जाते.  अभ्यासातून असे दिसून आले आहे की संत्र्यामध्ये पोटॅशियम सायट्रेट सारखे गुणधर्म असतात, जे किडनी निरोगी ठेवण्यास मदत करतात.

० अशक्तपणाचा धोका दूर होईल

शरीरात लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे ऍनिमियाचा धोका वाढतो. संत्र्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त नसले तरी ते व्हिटॅमिन सी (एस्कॉर्बिक ऍसिड) आणि सायट्रिक ऍसिड सारख्या कार्बनिक ऍसिडचे उत्कृष्ट स्त्रोत मानले जातात. या दोन्हीमुळे शरीराच्या पचनसंस्थेतून लोहाचे शोषण वाढू शकते.  ऍनिमिया असलेल्या लोकांना यामुळेच संत्री खाण्याचा सल्ला दिला जातो.

० त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर

संत्र्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात, ज्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.  अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक रोज एक संत्री खातात ते वयाच्या ५० व्या वर्षीही तरुण दिसू शकतात. त्वचेचा रंग सुधारण्यासाठी देखील हे फायदेशीर मानले जाते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar