error: Content is protected !!
डाळींब हे एक असे फळ आहे जे बर्षभर सहज उपलब्ध होते. हे फळ काही लोकांना खाण्यास आवडते, तर काहींना त्याचा ज्यूस करून पिणं आवडतं. डाळींबमध्ये ऍटीऑक्सिाडंट, फायबर, व्हिटॅमिन असतात.
1.तापामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते. डाळींब खाल्ल्याने उष्णता कमी होते.
2.डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
2.गर्भावस्थेतील महिलांना ऍऩिमिया अधिक प्रमाणात असते. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये मोठ्याप्रमाणात लोह आहे. त्यामुळे रक्ताची कमतरता जाणवत असेल तर रोज डाळिंबाचा ज्यूस घ्यावा.
3.डाळींब शरीरातील इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करते. त्यामुळे सध्याच्या संक्रमणाच्या काळात डाळींब खावे किंवा ज्यूस घ्यावे.
4.डाळींबमध्ये मॅग्नेशियमची मात्रा बऱ्यापैकी आहे, जे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
अपचन, पोटात गॅस होणे, शैचास साफ न होणे डाळींब फायदेशीर ठरते.
5.तोडांस दुर्गंधी येत असेल तर डाळींबाचे दाणे चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते.
6.जुलाब होत असल्यास डाळींब खावे किंवा ज्यूस प्यावे.
7.नियमित डाळींब खाल्यास त्वचा तजेलदार राहते.
डॉ आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.
संपर्क : 7385728886.
error: Content is protected !!
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar