मुंबई – अनेकदा हिवाळ्यात ओठ आणि त्वचा कोरडी पडू लागते. थंडीचा प्रभाव आपल्या त्वचेवरही मोठ्या दिसू लागतो. अशा वेळेस अनेकदा गरम पाण्याने अंघोळ केल्याने आणि कमी पाणी प्यायल्याने आपली त्वचा देखील कोरडी पडू शकते. यासोबतच पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर डाग आणि सुरकुत्या दिसू लागतात. अशा परिस्थितीत त्वचा मुलायम ठेवण्यासाठी नॅचरल तेल हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे तेल त्वचेला तेल लावल्याने त्वचा मॉइश्चराइज होते. क्रीम किंवा लोशन ऐवजी फक्त नैसर्गिक तेलाचा वापर थंडीत केल्यास खूप फायदा होतो.
दररोज आपल्या चेहऱ्याला नॅचरल तेलाने मसाज करा. यामुळे तुमची त्वचा मुलायम राहील. पुढील प्रकारच्या नॅचरल तेलांचा वापर करून तुम्ही चांगली त्वचा मेंटेन करू शकता.
सूर्यफूल तेल
चेहऱ्यावर हे तेल लावल्याने सुरकुत्याची समस्या उशिरा उदभवतात. सूर्यफूल तेल पिंपल्सची समस्या देखील दूर करते. सूर्यफुलाचे तेल चेहऱ्यावरील खड्डे दूर करण्यासाठी तसेच त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे तेल तुम्ही कापसाच्या मदतीने रात्री चेहऱ्याला लावू शकता.
हर्बल तेल
हिवाळ्यात त्वचा मुलायम बनवण्यासाठी तुम्ही काही औषधी वनस्पतींचे तेलही वापरू शकता. त्यात कडुनिंब, मंजिष्ठ, यष्टिमधू, इत्यादी आयुर्वेदिक तेलांचा समावेश तुम्ही करू शकता. यासंबंधी लागणारी सामग्री सहजतेने उपलब्ध होते.
बदाम तेल
हिवाळ्यात बदामाचे तेल खूप फायदेशीर मानले जाते. बदामाच्या तेलाने त्वचेला मसाज केल्याने त्वचा मुलायम राहते. इतकेच नाही तर डोळ्यांवरील काळी वर्तुळे दूर करण्यासाठीही बदामाचे तेल फायदेशीर मानले जाते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रोज रात्री बदामाचे तेल लावू शकता ज्यामुळे तुमची त्वचा छान राहील. .
The post हिवाळा सुरु झालाय ! थंडीमध्ये नॅचरल ऑइलने चेहऱ्याला करा मसाज,त्वचा होईल आणखी सुंदर appeared first on Dainik Prabhat.
