Saturday, December 6, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

‘हा’ आहे जगातील हा सर्वात धोकादायक पक्षी! खंजिरासारख्या नखांनी घेऊ शकतो जीव

by प्रभात वृत्तसेवा
October 19, 2021
in लाईफस्टाईल
A A
‘हा’ आहे जगातील हा सर्वात धोकादायक पक्षी! खंजिरासारख्या नखांनी घेऊ शकतो जीव
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

तुम्ही तुमच्या आजूबाजूला अनेक पक्षी पाहिले असतील. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणे आणि आकाशात उडणारे वेगवेगळे पक्षी पाहणे कुणाला नाही आवडत?  या छोट्या रंगीबेरंगी पक्ष्यांच्या हालचाली पाहून एक वेगळाच दिलासा मिळतो. एरवी निरुपद्रवी असणाऱ्या या पक्ष्यांपैकी एक पक्षी असा देखील आहे जो तुमचा जीवही घेऊ शकतो! होय, या पक्ष्याचे नाव कॅसोवरी ( cassowary bird ) आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हा पक्षी सर्वात धोकादायक पक्षी म्हणून गणला गेला आहे. यावरून हा पक्षी किती धोकादायक आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो.  जगातील सर्वात धोकादायक पक्ष्यांपैकी एक असलेल्या कॅसोवरीची नखं एखाद्या खंजीरपेक्षा कमी नाहीत.

कॅसोवरीच्या पायाच्या बोटांच्या आतील बाजूस खंजिरीसारखा तीक्ष्ण पंजा असतो, ज्यामुळे तो एखाद्या व्यक्तीच्या पोटात नखे खुपसल्यास त्या व्यक्तीचा क्षणार्धात जीव जाऊ शकतो. जर कॅसोवरी पक्षी आक्रमक झाला, तर तो थेट हल्ला करून आपल्या शत्रूंवर त्याच्या पंजेने वेगाने हल्ला करतो.

* सर्वसाधारणपणे हे पक्षी ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम आफ्रिकेच्या गिनी देशात आढळतात.  त्वचेवर निळे ठिपके असलेल्या मादी कॅसोवरीचे सरासरी वजन 59 किलो आणि नर कॅसोवरीचे वजन 34 किलो पर्यंत असू शकते.  हा कॅसोवरी पक्षी जोड्यांमध्ये किंवा कौटुंबिक गटांमध्ये राहतो.  कॅसोवरी पक्ष्यांमध्ये कार्यक्षमतेने पोहण्याची आणि कुशलतेने मासे पकडण्याची उत्तम क्षमता असते.  हेच कारण आहे की त्यांना पाण्याजवळ राहायला आवडते.

* कॅसोवरीचे डोळे खूप धोकादायक दिसतात, हे पाहून असे वाटते की ते कधीही हल्ला करू शकतात. तसेच, कॅसोवरीच्या डोक्यावर मुकुटासारखा अतिशय आकर्षक दिसणारा तुरा असतो. हा तुरा त्यांना डोक्याला दुखापत होण्यापासून वाचवतो.

* याशिवाय तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, इतका धोकादायक आणि आक्रमक असूनही, प्राचीन काळी लोक मांस आणि पंखांसाठी कॅसोवरी पक्ष्याची शिकार करायचे.  कारण हा पक्षी कबूतर किंवा कोंबडीसारखा लहान किंवा पाळीव नाही, तर खूप मोठा आणि शिकारी पक्षी आहे.

* नर कॅसोवरी पक्षी आपले घरटे सोडत नाहीत. त्यामुळे अंड्यांचे रक्षण करताना ते जास्त अन्न खाऊ शकत नाहीत. म्हणून शिकारींना त्यांची शिकार करणे अद्याप सोपे आहे. आजही कॅसोवरी पक्ष्यांना न्यू गिनीमध्ये त्यांच्या मांस आणि पंखांसाठी पाळले जाते. या पक्ष्यांच्या अंड्यांना तेथे राष्ट्रीय अन्नाचा दर्जा मिळाला आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar