Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

हाडांची घनता वाढवण्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’ खूप आवश्‍यक

by
November 20, 2022
in आरोग्य वार्ता
A A
हाडांची घनता वाढवण्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’ खूप आवश्‍यक
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आपल्याला लहानपणापासूनच हाडे मजबूत करण्यासाठी डेअरी आणि कॅल्शियम सप्लिमेंट्‌ससारखे कॅल्शियमयुक्‍त पदार्थ दिले जातात. परंतु सत्य हे आहे की निरोगी हाडांसाठी कॅल्शियम हे एकमेव आवश्‍यक खनिज नाही. निरोगी हाडे राखण्यासाठी इतर अनेक पोषक घटक तितकेच आवश्‍यक आहेत. ही सर्व खनिजे मिळून हाडांची घनता वाढवतात आणि वयानुसारही ते निरोगी राहतात. 

शरीराची रचना चांगली ठेवण्यासाठी निरोगी हाडे खूप महत्त्वाची मानली जातात. मजबूत हाडे तुम्हाला केवळ योग्य स्थितीत उभे राहण्यास मदत करत नाहीत तर नाजूक अवयवांचे कोणत्याही प्रकारच्या दुखापतीपासून संरक्षण करण्यासदेखील मदत करतात. याशिवाय वयानुसार दुखापत आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यासाठी लहानपणापासूनच हाडे निरोगी ठेवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. साधारणपणे हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम हे अत्यंत आवश्‍यक मानले जाते, पण फक्‍त कॅल्शियम हाडांची पूर्ण काळजी घेऊ शकते का? त्यावर तज्ञांचे उत्तर आहे- नाही.

आहारात व्हिटॅमिन केचा समावेश करा
तुम्ही हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन केबद्दल ऐकले असेल, परंतु अभ्यास दर्शविते की निरोगी हाडे राखण्यासाठी व्हिटॅमिन के देखील आवश्‍यक आहे. रक्‍त गोठणे आणि कॅल्शियम चयापचयमध्ये आवश्‍यक भूमिका बजावणारे प्रोटीन सक्रिय करण्यासाठी व्हिटॅमिन के जबाबदार आहे. व्हिटॅमिन के मिळविण्यासाठी ब्रोकोली, पालक, कोबीचे सेवन केले जाऊ शकते.

प्रथिनांचे सेवन आवश्‍यक
पेशींच्या वाढीसाठी आणि स्नायूंच्या वस्तुमानासाठी प्रथिने महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जाते. प्रथिनांचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे हाडांचे वस्तुमान राखणे आणि वयानुसार हाडे आणि स्नायू टिकवणे. अभ्यास दर्शविते की प्रथिनेयुक्‍त आहार घेतल्यास हाडांची घनता वाढू शकते. प्रथिने पुरेशा प्रमाणात घेतल्यास फ्रॅक्‍चर आणि हाडांचे नुकसान होण्याचा धोकादेखील कमी होतो. प्रथिनांच्या स्रोतांमध्ये मसूर, बीन्स, मांस, पोल्ट्री आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश होतो.

व्हिटॅमिन डी खूप आवश्‍यक
हाडांची घनता वाढवण्यासाठी आणि त्यांना निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्‍यक आहे. व्हिटॅमिन डी कॅल्शियमचे शोषण करण्यास आणि रक्तातील पोषक तत्वांचे पुरेसे प्रमाण राखण्यास मदत करते. जेव्हा तुमच्या रक्तातील कॅल्शियमची पातळी कमी होते, तेव्हा तुम्ही खाल्लेल्या अन्नातून किंवा हाडांमधून खेचून हे पोषक तत्व शोषले जाऊ लागते. व्हिटॅमिन डीसाठी अनेक प्रकारचे मासे, भेंडी, पालक, सोयाबीनचे सेवन करता येते.

 

The post हाडांची घनता वाढवण्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’ खूप आवश्‍यक appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar