नवा जमाना येतो तसतसशी फॅशन बदलते. मात्र काही जुन्या फॅशन नव्या रूपात येतात आणि तरुणींमध्ये तो ट्रेंड बनतो. फॅशन ट्रेंड्स सारखे बदलत असतात. पण जुन्या फॅशनमध्ये काही बदल करून नवी फॅशन समोर येते.
डिझायनर्स नवनवे प्रयोग करून फॅशनची चलती ठेवतात. त्यासाठी जुन्या काळातील काही ट्रेंड्सचाही वापर करतात. 90 च्या दशकातील सॅटिन ड्रेसेस ही एक अतिशय लोकप्रिय फॅशन सध्या तरुणी फॉलो करतायेत.
अनेक सेलिब्रिटींनाही या फॅशनची भूरळ आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत चर्चेत असलेल्या प्रियांका चोप्राच्या फॅशनचीही चर्चा होते. बेल स्लिव्सच्या ग्रीन कलरच्या सॅटिन टॉपमधील तिचा हटके लूक चाहत्यांना भावला.
शिल्पा शेट्टी नेहमीच वेगवेगळी फॅशन वापरते. नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांमध्ये ती दिसते. मात्र सॅटिन ड्रेसमध्येही ती दिसते. या लूकमुळे शिल्पा क्लासी दिसते. करीना कपूरही सॅटिन आउटफीटमध्ये उठून दिसते. ऑलिव्ह रंगाच्या सॅटिन टॉपमधील तिचा लूक चाहत्यांना आपल्या डोळ्यांमध्ये साठवला.
बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री फिल्म फेस्टिव्हल, अवॉर्ड फंक्शन, विविध पार्टींमध्ये सॅटिनच्या ड्रेसमध्ये दिसतात. या फॅशनमुळे एकाच वेळी बोल्ड आणि क्लासी लुक मिळतो. त्यामुळे तुरुणींमध्ये ही जुनी फॅशन चांगलीच लोकप्रिय झाली आहे.