[[{“value”:”
sleeping tourism : सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये आपण शरीरासाठी जे सर्वात गरजेचे असते तीच गोष्ट विसरतो. ती म्हणजे विश्रांती. नेहमीच प्रवास म्हणजे विविध ठिकाणे पाहणे, नव्या ठिकाणी जाणे, स्थानिक खाद्यपदार्थांची चव चाखणे, शॉपिंग करणे असे मानले जाते. मात्र आता टुरिझम मध्ये नवा ट्रेंड उदयास आला असून त्यामध्ये स्लीपिंग टुरिझमचा समावेश करण्यात आलेला आहे.
सुरुवातीला तुम्हाला हे काहीसे विचित्र वाटू शकेल, परंतु स्लीपिंग टुरिझमचे प्राथमिक उद्दिष्ट हे विविध ठिकाणी पाहण्याबरोबरच विश्रांती आणि व्यक्तीने ताजेतवाने व्हावे हा असतो. अशा या वैशिष्ट्यपूर्ण स्लीपिंग टुरिझम विषयी आणि तुम्ही या प्रकारच्या टुरिझमची भारतात कुठे अनुभूती घेऊ शकता याविषयी…
स्लीपिंग टुरिझम मध्ये तुमच्या पर्यटनात विश्रांतीला प्राधान्य देण्यात आलेले असते. ज्यांना नोकरी-व्यवसायामुळे खूप दगदग करावी लागते आणि सतत तणाव, कामाचे वेळापत्रक पाळणे, उशिरापर्यंत काम करावे लागणे अशा जगण्यामुळे त्रस्त असलेल्यांमध्ये हा ट्रेंड लोकप्रिय ठरत आहे. ताणतणाव दूर सारून मस्तपैकी झोप घ्यावी, विश्रांती घेऊन शरीर आणि मन ताजेतवाने, तरतरीत व्हावे यासाठी लोक स्लीपींग टुरिझमचा स्वीकार करत आहेत.
तुम्हांलाही स्लीपींग टुरिझमचा अनुभव घ्यायचा असेल तर पुढील पाच ठिकाण शांत व सुंदर आहेत. याठिकाणी तुम्ही विश्रांती, शांतता यामुळे ताजेतवाने आणि तरतरीत होऊ शकता.
१) चक्रतार आणि ऋषिकेश (उत्तराखंड) – उत्तराखंडमध्ये चक्रतारा आणि ऋषिकेसारखी ठिकाणी तर तुम्हांला ताजेतवाने करून टाकतात. चक्रतारा हे अतिशय शांत असे हिल स्टेशन आहे. शहरातील धावपळ आणि धकाधकीच्या जीवनापासून निवांत असे हे ठिकाण आहे. मनाची शांतता, अध्यात्मिक अनुभूतीबरोबरच मनावरील तणाव कम होण्यास मदत होते.
२) चेरापुंजी, मेघालय – पृथ्वीच्या पाठीवरील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण अशी चेरापुंजीची ओळख आहे. डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग, हिरव्यागार डोंगररांगा आणि अधूनमधून पडणारा पाऊस अशी या ठिकाणाची ओळख आहे. याठिकाणी तुमच्या मनावरील ताणतणाव निसर्गाच्या सौंदर्यात कुठल्या कुठे विरघळून जातो. इथल्या शांततेत तुम्हांला गाढ झोप लागते आणि तुम्ही जागे होता तेव्हा ताजेतवाने झालेले असता. त्यामुळेच हे ठिकाण स्लीपींग टुरिझमसाठी योग्य ठरले आहे.
३) कुर्ग (कर्नाटक) – पश्चिम घाटात विसावलेले कुर्ग हे कॉफीचे मळे, थंड हवामान आणि शांत परिसरासाठी ओळखले जाते. इथल्या निवांत वातावरणामुळे हे ठिकाण आराम, विश्रांती, झोप आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी अगदी योग्य आहे. काहीही न करता निवांतपणे पडून राहणे, सहजपणे गावातील बाजारपेठेत फेरफटका मारणे, कॉफीचे मळे पाहणे अशा वातावरणात तुमच्या मनावरील ताण आणि मळभ कुठल्या कुठे पळून जाते.
४) मुन्नार (केरळ) – मुन्नार हे तेथील चहांच्या मळ्यासाठी, धुक्यात हरवलेले डोंगर, हिरवागार परिसर यासाठी प्रसिद्ध आहे. निसर्गाच्या सानिध्यात तुम्हांला शांत व गाढ झोप हवी असेल तर निसर्ग सौंदर्याने वेढलेल्या केरळमधील या हिल स्टेशनला तुम्ही भेट द्यायलाच हवी. थंड आणि आल्हाददायक हवा, शहरी जीवनापासून दूर, नितळ शांतता यामुळे स्लीपींग टुरिझमसाठी हे अगदी योग्य ठिकाण आहे.
The post ‘स्लीपिंग टुरिझम’ म्हणजे काय? आता प्रवासात मिळणार रिलॅक्सेशनचा नवा अनुभव ! appeared first on Dainik Prabhat.
“}]]
