Saturday, June 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

स्मार्टफोन वापरताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे मोबाईलमध्ये व्हायरस कधीच येणार नाही

by प्रभात वृत्तसेवा
May 3, 2022
in लाईफस्टाईल
A A
स्मार्टफोन वापरताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे मोबाईलमध्ये व्हायरस कधीच येणार नाही
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली – तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सायबर फसवणुकीचे जग देखील खूप वेगाने वाढत आहे. आज हॅकर्स तुमचा वैयक्तिक डेटा फोडण्यासाठी विविध युक्त्या वापरत आहेत. ते स्पायवेअर आणि विविध प्रकारच्या मालवेअरद्वारे तुमचा वैयक्तिक डेटा लीक करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा परिस्थितीत तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे. तुमची जागरूकता ही तुमच्या सायबर सुरक्षिततेची पहिली हमी आहे.

तुमचीही इच्छा असेल की तुमच्या फोनमध्ये कोणत्याही प्रकारचे व्हायरस किंवा स्पायवेअर ऍप कधीही येऊ नये, तर आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही खालील गोष्टींची काळजी घेतली तर तुमच्या फोनवर मालवेअर अटॅक, स्पायवेअर ऍप किंवा कोणताही व्हायरस येण्याचा धोका खूप कमी होईल. चला, त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया –

अनेकदा आपण कोणत्याही अविश्वासू किंवा पायरेटेड वेबसाइटला भेट देतो. त्यादरम्यान, मोबाइलमध्ये व्हायरस किंवा कोणतेही स्पायवेअर ऍप इन्स्टॉल होण्याची शक्यता लक्षणीय वाढते. त्यामुळे कधीही अविश्वसनीय किंवा नवख्या वेबसाइट्सना भेट देऊ नका.

याशिवाय, जर तुम्ही एखाद्या अनोळखी लिंकवर क्लिक करत असाल तर त्या लिंकला भेट दिल्यानंतर तेथून कोणत्याही प्रकारची फाईल डाउनलोड करू नका. असे केल्याने तुमच्या फोनमध्ये व्हायरस येऊ शकतो. याशिवाय तुमचा खाजगी डेटाही लीक होऊ शकतो.

अनेकदा आपल्यापैकी बहुतेक जण मोफत इंटरनेटच्या लोभापोटी आपला फोन कोणत्याही अज्ञात वायफायशी जोडतात. तुम्हीही ही चूक करत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.

काही वेळा सार्वजनिक किंवा मोफत वायफाय करप्ट होते. त्याला कनेक्ट केल्याने स्मार्टफोनमध्ये व्हायरस येऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या कारणास्तव तुम्ही तुमचा फोन कधीही अज्ञात किंवा मोफत वायफायशी कनेक्ट करू नका.

तुम्ही अधिकृत Google Play Store वरून तुमच्या स्मार्टफोनवर मोबाइल ऍप डाउनलोड करावे. कोणत्याही थर्ड पार्टी लिंक किंवा ऍपवरून तुमचा फोन ऍप्लिकेशन कधीही डाउनलोड करू नका. असे केल्याने तुमच्या फोनमध्ये व्हायरस येऊ शकतो आणि तुमच्या गोपनीयतेचा भंग होऊ शकतो.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar