Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

स्तनांच्या कर्करोगाचे प्रारंभिक अचूक निदान शक्‍य – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
November 22, 2021
in आरोग्य वार्ता
A A
स्तनांच्या कर्करोगाचे प्रारंभिक अचूक निदान शक्‍य – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – स्तनांच्या कर्करोगाचे प्रारंभिक आणि अचूक निदान करणारी रक्त चाचणी “दातार कॅन्सर जेनेटिक्‍स’द्वारे विकसित करण्यात आली असून, भारतात विकसित या चाचणीला नुकताच अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) “ब्रेक थ्रू’ (महत्त्वाचे संशोधन) प्राप्त झाले आहे. अशा प्रकारची ही पहिलीच रक्तचाचणी असून, याद्वारे आता 40 वयोमर्यादेच्या पुढील स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रारंभिक आणि अचूक निदान करणे शक्‍य होणार आहे.

प्रोप्रायटरी टेक्‍नॉलॉजीचा वापर करत सदर चाचणीद्वारे स्तनांच्या कर्करोगाशी संबंधित पेशी आणि क्‍लस्टर्स हे अचूकपणे ओळखले जातात. क्‍लिनिकल ट्रायल्सच्या माहितीवरून या चाचणीद्वारे प्रारंभिक आणि स्टेज 1 च्या कर्करोगासंदर्भात 99% अचूक माहिती मिळू शकते, हे समोर आले आहे. “दातार जेनेटिक्‍स’चे अध्यक्ष राजन दातार यांनी याविषयी माहिती दिली.

या चाचणीसाठी केवळ पाच मिली रक्त आवश्‍यक असून, निरोगी आणि कर्करोगाच्या रूग्णांचा समावेश असलेल्या तब्बल 20 हजारांहून अधिक महिलांवर ही चाचणी प्रमाणित करण्यात आली आहे. या चाचणीमुळे मॅमोग्राफीशी संबंधित कोणत्याही रेडिएशनचा संपर्क येत नाही. भारतात दरवर्षी साधारणत: 1 लाख 70 हजारांवर महिलांना स्तनाचा कर्करोग असल्याचे आढळून आले आहे, यातील बहुतांश जणींना स्टेज 3 किंवा 4 ला कर्करोगाचे निदान झाल्याचे समोर आले. अशावेळी कर्करोगापासून मुक्ती मिळणे हे अशक्‍य आणि खर्चिक होऊन बसते. त्यामुळे ही रक्तचाचणी या निदानामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.

“कर्करोगाची कोणतीही लक्षणे नसणाऱ्या चाळीस वर्षांवरील महिलांना डॉक्‍टरांच्या सल्ल्याने तसेच आपल्या सुविधेप्रमाणे घरून अथवा कार्यालयामधून ही रक्ततपासणी करून घेणे शक्‍य आहे. ही चाचणी युरोपमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे, भारतात ती वाजवी किंमतीमध्ये “ईझीचेक’ नावाने उपलब्ध होऊ शकणार आहे. या संदर्भात हेल्थकेअर प्रोव्हायडर्स यांच्याशी चर्चा सुरू आहे.”
– राजन दातार, अध्यक्ष, दातार जेनेटिक्‍स

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar