Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सौदी अरेबिया निर्माण करतंय जगातील आठवं आश्चर्य ! सायन्स फिक्शनवर आधारित ‘द लाईन’ची जोरदार तयारी सुरु

by प्रभात वृत्तसेवा
July 29, 2022
in लाईफस्टाईल
A A
सौदी अरेबिया निर्माण करतंय जगातील आठवं आश्चर्य ! सायन्स फिक्शनवर आधारित ‘द लाईन’ची जोरदार तयारी सुरु
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

कच्च्या तेलातून कमाई करणारा सौदी अरेबिया जगातील आठवे आश्चर्य बनवणार आहे. सौदी अरेबिया एक असे शहर वसवणार आहे जे तुम्ही आतापर्यंत फक्त सायन्स फिक्शन चित्रपटांमध्येच पाहिले असेल. या ‘व्हर्टिकल सिटी’ची रुंदी केवळ 200 मीटर असेल, तर त्याची लांबी 161 किलोमीटर आणि उंची 500 मीटर असेल, जी काचेने मढवली जाईल.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे संपूर्ण शहर अक्षय ऊर्जेवर चालणार आहे. शहराला सौरऊर्जा, पवनऊर्जा, बायोमास आणि हायड्रो पॉवरपासून निर्माण होणारी वीज पुरवठा करण्यात येणार आहे. सौदी अरेबियाने या शहराला ‘द लाइन’ असे नाव दिले आहे. भविष्यातील शहर वसवण्याचा हा प्रकल्प असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या शहरातील नागरिकांना प्रदूषित जगात शुद्ध हवा मिळणार आहे. येथे व्यवसायासाठी कार्यालये, मुलांसाठी शाळा-महाविद्यालये, मनोरंजनासाठी उद्यानेही उभी केली जाणार आहेत.

जगात प्रथमच उंच वाढणारे शहर उभारले जाणार आहे. या शहरात राहणारे नागरिक एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अवघ्या 20 मिनिटांत पोहोचतील. कारण येथे हायस्पीड ट्रेन धावणार आहे. या शहरात घरांच्या वरती घरे बांधली जाणार आहेत. या शहरात लेअर बाय लेयर फ्लॅट्स बांधले जाणार आहेत.

सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिल सलमान यांनी 2021 मध्ये या प्रकल्पाविषयी सर्वप्रथम सांगितले. हे शहर वसवण्यासाठी 39.95 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ‘द लाइन’ शहर अर्धा किलोमीटर उंचीच्या काचेच्या भिंतींनी झाकले जाणार आहे.

या शहरात कोणतेही प्रदूषण होणार नाही आणि कोणत्याही प्रकारचे कार्बन उत्सर्जन होणार नाही. या शहरात 90 लाख लोकांच्या राहण्याची व्यवस्था असेल. ते पूर्णपणे व्हर्टिकल म्हणजेच उभे शहर असेल. या शहरात रस्ते नाहीत आणि गाड्याही धावणार नाहीत. हे शहर सुमारे 26,500 चौरस किलोमीटर परिसरात वसवले जाणार आहे. सर्व काही व्यवस्थित राहिल्यास हे शहर 2025 पर्यंत तयार होईल.

* शहर ‘असे’ दिसेल
सौदी अरेबियाच्या प्रेस एजन्सीने शहराच्या डिझाईन्सच्या क्लिप प्रसिद्ध केल्या आहेत. शहर आकर्षक, फ्यूचरिस्टिक आणि हिरवेगार असल्याचे दिसून आले आहे. घरांच्या छतावर बागा दाखवल्या आहेत. त्यात एकाच प्रकारचे दृश्य पाहायला मिळेल.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar