आज काल सतत आपण ऐकत असतो की बॉडी पॉलिशिंग, बॉडी एक्स्फोलिएटिंग करण्यात येतं, खास करुन नववधू तर लग्नाच्या आधी या ट्रीटमेंट करून घेतच आहे. नक्की या ट्रीटमेंट काय असतात. पूर्ण शरीरावरील बॉडी पॉलिशिंग अथवा बॉडी एक्स्फोलिएटिंग म्हणजे काय? यामध्ये महत्त्वाचे आहे एक्स्फोलिएटिंग आणि स्क्रब आणि पॉलिशिंग यातील फरक माहिती असणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा आपणाला या प्रसाधनांच्या उपयोगाच्या फरकांची माहिती नसते. सौंदर्य प्रसाधनांच्या दालनात या ट्रीटमेंट होतात आणि ह्या करण्याने खूप काही छानसं आपण अनुभवू शकतो हेच आपल्याला माहित असतं. पण यामध्ये सुद्धा वापरण्यात येणारे प्रॉडक्ट हे आपल्या शारीरिक गरजेनुसार आहेत का इकडे आपले लक्ष असले पाहिजे.
बॉडी ट्रीटमेंट मधील एक्स्फोलिएटिंग, स्क्रब, पॉलिशिंग एजंट या तिन्हींचा फरक जाणून घेऊ.
एक्स्फोलिएटिंग ट्रीटमेंट या कायम त्वचेच्या आत जाऊन काम करतात तर स्क्रब हा त्वचेच्या सुपर फेशियल लेयरवरती काम करतो. त्यामुळे स्क्रबचे ग्रॅन्युल्स हे थोडे खरबडीत क्रिमी असतात. तर एक्स्फोलिएटिंग एजंट हा प्रॉडक्ट कायम स्मूथ असतो. तो त्वचेच्या आत शिरून त्वचेच्या आतील आवरणापर्यंत स्वच्छतेचे काम करतो. स्क्रब मात्र त्वचेवरील भाई आवरणावरील धूळ अथवा मृतपेशी बाजूला काढण्यास मदतनीस ठरतो.
स्क्रब हा सगळ्यांच्या ओळखीचा आणि सर्रास वापरला जाणारा सौंदर्य प्रसाधनाचा प्रॉडक्ट. स्क्रब म्हणजे नक्की काय असते. स्क्रबमध्ये शरीरावरील नको असलेली साठलेली धूळ अथवा मृतत्वचा थोडीशी निघून जाणारे घटक सामावलेले असतात मऊ अशा क्रीममध्ये सामावलेले असतात. स्क्रब हा कायम क्रीम अथवा जेल बेस असतो. हा स्क्रब शरीरावरील त्वचेची आर्द्रता सांभाळून साठलेली घाण मळ अथवा मृतत्वचा काढून टाकण्यास मदत करतो. ज्यामुळे त्वचेची रंध्र रिकामी होऊन त्वचेचा रेस्पिरेशन वाढतं. शरीरावरील त्वचेला एक प्रकारचा गुळगुळीतपणा येतो.
एक्स्फोलिएटिंग एजंट अथवा पॉलिशिंग एजंट एक्स्फोलिएटिंग लाच पॉलिशिंग एजंट असे म्हणतात.
एक्स्फोलिएटिंग हा प्रॉडक्ट केमिकल और मेकॅनिकल असा दोन्ही पद्धतीने बाजारात उपलब्ध असतो. शरीरावरील साठलेल्या मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्याचं काम एक्स्फोलिएटिंग एजंट करतो. ज्यामुळे त्वचेचा पोच सुधारून त्वचेमध्ये त्वचेमध्ये एक प्रकारचा उजाळा येतो, त्यासोबत अन इव्हन त्वचा इव्हन होण्यासाठी मदत होते म्हणजे त्वचेचा रंग एक सारखा होण्यास मदतनीस ठरते. ज्यामुळे त्वचेला एक प्रकारची चकाकी येते व त्वचा मऊमुलायम होते.
यामुळे बॉडी स्पा या थेरपीमध्ये बॉडी एक्स्फोलीऐशन अथवा स्क्रब करणे हा एक महत्त्वाचा भाग असतो. बॉडी स्पामध्ये पहिल्यांदा संपूर्ण शरीरावर हॉट टॉवेलिंग ही क्रिया केली जाते. गरम पाण्याच्या सहाय्याने टर्किश टॉवेलच्या मदतीने संपूर्ण शरीरावर हॉट टॉवेलिंग ही क्रिया करण्यात येते. ज्यामुळे शरीराच्या त्वचेतील इपिडरमिस हा थर टॉवेल मधील पाण्याच्या उष्णतेने थोडासा नरम होतो. ज्यामुळे त्वचेची रंध्रे उघडी होण्यास मदत होते व त्वचा स्क्रब अथवा एक्स्फोलिएशनसाठी तयार होते. नववधूने ही थेरपी नक्की करावी, स्त्री-पुरुष दोघांनी एका ठराविक वयानंतर या थेरपीचा नक्की विचार करावा. बॉडी स्क्रब अथवा बॉडी एक्स्फोलिएशन हे कोणीही केलं तरी चालू शकते. शरीरावर कुठे जखम असेल रक्त साखळले असेल अथवा एखादा त्वचा विकार आजार झाला असेल तर मात्र हे करणे टाळावे. स्त्रियांनी हात व पाय यासाठी स्क्रबिंग करणे हे अतिशय उत्तम ठरते. पण जेव्हा आपण बॉडी स्पाचा विचार करतो तेव्हा बॉडी एक्स्फोलेशनचाच विचार करावा. एक्सप्लेनेशन एजंट हे काही प्रमाणात अगदी माईल्ड ऍक्टिव्ह असतात ज्याच्यामध्ये अरोमा बेस काही गोष्टी असल्यामुळे त्यातील घटक हे शरीरातील अंतर्गत क्रियांना उत्तेजित करणारे ठरू शकतात. याचबरोबर ही प्रक्रिया करत असताना शरीराला हलकासा एफलराज मसाज मिळाल्यामुळे शरीरातील मांसपेशी उत्तेजित होण्यास मदत होते.
ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. चयापचय क्रिया चांगली होते. मेंदूला रक्तपुरवठा होऊन खूप प्रमाणात हलके असे शरीर जाणवते. ज्या लोकांना अति घाम येणे किंवा घामाची दुर्गंधी येण्याचा त्रास असतो, तसेच शरीरातील ठराविक भागांमध्ये अति घामाचे प्रमाण असते. अशा लोकांसाठी ही थेरपी औषधी ठरते. वारंवार त्वचा विकार होत असतील तर त्वचा विकार बरे झाल्यानंतर ही थेरपी घेतल्याने त्वचा विकार होण्याचे प्रमाण घटते. प्रामुख्याने वयाच्या वीस वर्षापर्यंत ही थेरपी घेणे टाळावी. आपल्या त्वचेचे पालन पोषण साधारणतः आपल्या वयाच्या 20 ते 25 वर्षापर्यंत होत असते. या कालावधीत बाहेरून त्वचेचे हलक्या प्रमाणात असलेले थर काढून टाकणे हे धोकादायक असते. त्यामुळे नववधुने हे करत असताना वयाचा विचार करूनच हे करावे.
योग्य तज्ञांच्या सल्ल्याने या थेरपीचा कायम अनुभव घ्याव्यात. बरेच जण स्क्रब हा रोजच्या दैनंदिन वापरात वापरतात. हे अतिशय चुकीचे आहे कारण ज्यामुळे आपली त्वचा शुष्क होण्याची शक्यता असते. तसेच एक्सफोलिएटर सुद्धा दैनंदिन जीवनात वापरणे हे अतिशय चुकीचे आहे. या गोष्टी जशी आपल्या त्वचेला फायदे देतात तसेच अतिवापरामुळे नुकसानही देतात. स्क्रब वापरायचा असेल तर आपल्या वयोमानानुसार आठवड्यातून एकदा वापरणे योग्य ठरते. स्क्रब अथवा एक्सफोलिएटर हे सौंदर्यप्रसाधनांच्या दालनांमध्ये जाऊन करणे कायम योग्यच पण यासारखे काही घरगुती उपाय ही आपण घरी करू शकतो.
यासाठी काही गोष्टींची माहिती आपणास असणे गरजेचे असते. तांदळाचे पीठ, मसुरीच्या डाळीचे पीठ, मध, रॉ शुगर, कॉफी पावडर, बटाट्याच्या सालीचे पाणी, मिल्क पावडर, दही अंड्याचा पांढरा बलक, डाळिंबाची सालं, जोजवा लव्हेंडर ऑइल चे काही थेंब , समुद्री मीठ, काही मिनरल्स यासारखे अनेक पदार्थ आपण घरगुती वापरून सुद्धा शरीरावरील मृत त्वचा काढून टाकू शकतो. आपल्या परंपरेनुसार दिवाळीमध्ये आपण जे काही उठणे वापरतो तो सुद्धा एक उत्तम एक्सफोलेटरचा प्रकार आहे. ज्यामध्ये नागरमोथा, सुगंधी वाळा, चंदन पावडर अशा बहुगुणी पावडर वापरण्यात आलेल्या असतात.
ज्यामुळे शरीरावरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत तर होतेच. पण वर सांगितल्याप्रमाणे अंतर्गत शरीरातील काही क्रिया पूर्ववत येण्यासही मदत होते. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला घरगुती काही गोष्टी करण्यास वेळ मिळत नाही तसेच काही सौंदर्यप्रसाधनांच्या दालनात जाण्यासही वेळ मिळत नाही अशा वेळेस असे काही घटक अभ्यासून आपण आपल्या दैनंदिन जीवनात या गोष्टींचा वापर करूनही या थेरपींचा अनुभव स्वतः घेऊ शकतो. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आपण आपल्या स्वतःसाठी कायम जागरूक राहावे.
The post सौंदर्याची उपासना : बॉडी एक्स्फोलिएटिंग, पॉलिशिंग आणि स्क्रब.. appeared first on Dainik Prabhat.