Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

सोशल मीडियापासून काही काळ दूर राहण्यासाठी आता इंस्टाग्रामचा ‘टेक अ ब्रेक’!

by प्रभात वृत्तसेवा
February 7, 2022
in लाईफस्टाईल
A A
सोशल मीडियापासून काही काळ दूर राहण्यासाठी आता इंस्टाग्रामचा ‘टेक अ ब्रेक’!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली : इंस्टाग्रामने ‘टेक अ ब्रेक’ फिचर देखील भारतात लाँच केले आहे. याआधी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात हे फिचर सादर करण्यात आले होते. इन्स्टाग्रामचे म्हणणे आहे की, ‘टेक अ ब्रेक’ फीचर युजर्सच्या हितासाठी आणले आहे जेणे करून ते सोशल मीडियापासून काही काळ दूर राहू शकतील. इन्स्टाग्रामचे प्रमुख ऍडम मोसेरी यांच्या मते, नवीन फीचर इन्स्टाग्रामच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त ठरेल.

ऍपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन टेक अ ब्रेक फीचर सुरू करावे लागेल. त्यानंतर एक वेळ निश्चित करावी लागेल. सेट केल्यानंतर, वापरकर्त्यांना निश्चित वेळेनुसार रिमाइंडर मिळेल. ‘टेक अ ब्रेक’ फीचर हा इंस्टाग्राममध्ये आधीपासून अस्तित्वात असलेल्या डेली लिमिट फीचरचा एक भाग आहे. इंस्टाग्रामने आपल्या प्लॅटफॉर्मवर जागरूकता पसरवण्यासाठी युवा मंच ‘वी द यंग’सोबत भागीदारी केली आहे. तसेच इंस्टाग्राम आणि वी द यंग अंतर्गत ‘ब्रेक जरूरी है’ मोहीम सुरू केली.

इंस्टाग्रामचे ‘टेक अ ब्रेक’ फीचर बाय डीफॉल्ट चालू केले जाणार नाही. वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार ते चालू किंवा बंद करू शकतील. ब्रेकसाठी 10, 20 आणि 30 मिनिटांचा पर्याय असेल. नोव्हेंबर 2021 मध्ये ऍडम मोसेरीने ट्विटरवर या फिचरबद्दलचा एक व्हिडिओ देखील शेअर केला होता.

इन्स्टाग्रामने भारतीय बाजारपेठेत सशुल्क सबस्क्रिप्शन सेवेची चाचणी देखील सुरू केली आहे. प्रथम, हे यूएस मधील काही वापरकर्त्यांसाठी लॉन्च केले गेले. इंस्टाग्रामच्या सबस्क्रिप्शन फीचर अंतर्गत, फॉलोअर्सना सामान्य आणि विशेष कन्टेन्टसाठी सबस्क्रिप्शन द्यावे लागेल.

सदस्यता घेतलेल्या फॉलोअर्सच्या नावांसह पर्पल बॅगेज दिसेल. वापरकर्त्यांना लाइव्ह व्हिडिओ, कथा विशेष कन्टेन्ट म्हणून मिळतील. आतापर्यंत इंस्टाग्राम वापरकर्त्यांकडे पेड सबस्क्रिप्शनसारखा कोणताही पर्याय नव्हता. 89 रुपये, 440 रुपये आणि 890 रुपये मासिक वर्गणी म्हणून भरावे लागतील. नवीन फीचर अँड्रॉइड आणि iOS दोन्हीसाठी एकाच वेळी लॉन्च होईल.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar